IMPIMP

PF Account | तुमच्या पीएफ खात्यामध्ये व्याजाचे पैसे कोणत्या हिशेबाने आले; जाणून घ्या

by nagesh
Business Idea | start tissue napkin paper manufacturing unit with help mudra loan scheme know full details

नवी दिल्ली : वृत्तसंस्था PF Account | साडेसहा कोटी कर्मचाऱ्यांना लाभ मिळणा-या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचा व्याज दिला जात आहे. केंद्र सरकारकडून (Central Government) दिल्या जाणा-या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (PF Account) खात्यामध्ये व्याजाचे पैसे जमा करण्यात येत आहेत. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (EPFO) सबस्क्रायबर्सच्या खात्यामध्ये हे व्याजाचे पैसे जमा केले जात आहे. तसेच, याबाबत मेसेजेस देखील त्या व्यक्तीपर्यंत पाठवले जात आहे. दरम्यान आपल्या खात्यात कुठल्या हिशेबाने पैसे जमा झाले आहेत. हे माहित करून घेण्यासाठी याबाबत सविस्तर जाणून घ्या.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

नेमका हिशेब कसा?

15 हजार रुपये मूळ पगार म्हणजेच बेसिक सॅलरी गृहीत धरून याबाबत हिशेब सांगण्यात आला आहे. मुळ वेतन + DA = 15,000 रुपये EPF मध्ये कर्मचाऱ्याचा हिस्सा = 15,000 रुपयांचे 12 टक्के = 1,800 रुपये EPS मध्ये कंपनीचं योगदान = 15,000 रुपयांचे 8.33 टक्के = 1,250 रुपये EPF मध्ये कंपनीचं योगदान = कर्मचाऱ्या हिस्सा-EPS मध्ये कंपनीचं योगदान = 550 रुपये प्रत्येक महिन्याला EPF मध्ये जातात एवढे पैसे = 1800 रुपये + 550 रुपये=2,350 रुपये.

2019-20 या आर्थिक वर्षासाठी व्याजदर = 8.50 टक्के या हिशेबाने प्रत्येक महिन्याला इतकं असेल व्याज = 8.50 टक्के /12 = 0.7083 टक्केअशा प्रकारे हिशेब होणार व्याज एप्रिलच्या अखेरीला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्याचा बॅलन्स= 2,350 रुपये मे महिन्यात EPF खात्यात होणार इतकं योगदान = 2,350 रुपये मे महिन्याच्या अखेरीला EPF खात्यात एकूण जमा होणार = 4700 रुपये, मे महिन्याच्या अखेरीला EPF खात्यात जमा होईल इतकं व्याज = 4700 रुपये X 0.7083 टक्के = 33.29 रुपये मे महिन्याच्या अखेरीला मिळणार इतकं व्याज = 33.29 रुपये, याद्वारे पुढील महिन्यांचं व्याजही हिशेब (PF Account) केलं जाईल.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

या दरम्यान, केंद्रातील मोदी सरकारने काही कालावधीपूर्वी नवे प्राप्तिकर विषयक नियम अधिसूचित केले आहेत.

यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (EPFO) खात्यांना 2 विविध खात्यात विभागलं जाणार आहे.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (CBDT) या नियमांनूसार, आता भविष्य निर्वाह निधीमध्ये एका ठराविक मर्यादेबाहेर जमा झालेल्या व्याजावर टॅक्स आकारला जाणार आहे.
ज्यांच्या PF खात्यात 1 वर्षात 2.5 लाख रुपयांहून जास्त रक्कम जमा होते, त्यांना हा नियम (PF Account) लागू होणार आहे.

 

Web Title: PF Account | know about the calculation and interest money which came in your pf account

 

हे देखील वाचा :

MPSC Exam | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! MPSC परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना एका वर्षाची मुदत वाढ

EPFO | पीएफ खातेधारकांसाठी खुशखबर ! मिळाली ‘ही’ मोठी भेट

Mumbai Police | विराट कोहलीच्या मुलीवर अत्याचार करण्याची धमकी देणार्‍या ‘इंजिनिअर’च्या मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या;

 

Related Posts