IMPIMP

Video : ‘ते दृश्य पाहून संपूर्ण रात्र झोपू शकलो नाही’, भर सभागृहात मुख्यमंत्र्यांना रडू काेसळलं

by amol
i couldnt sleep all night seeing scene chief minister manoharlal khattar was tears house

सरकारसत्ता ऑनलाइन – हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर (ManoharLal Khattar) मंगळवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी सभागृहात भावूक झाल्याचे दिसले. यावेळी बोलताना त्यांना रडू कोसळलं. ते म्हणाले, जेव्हा मी काँग्रेस नेते भूपेंद्र सिंह हुड्डा (Bhupinder Singh Hooda) यांना आंदोलनादरम्यान एका ट्रॅक्टरवर बसलेलं आणि महिला आमदारांना हे वाहन दोरीनं ओढत असताना पाहिलं तेव्हा मला खूप दु:ख झालं. टीव्हीवर ते दश्य पाहिल्यानंतर मी संपूर्ण रात्र झोपू शकलो नाही, असंही ते म्हणाले.

मनोहरलाल खट्टर ManoharLal Khattar यांनी सोमवारी पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅसच्या वाढत्या किमतींविरोधात काँग्रेसच्या आंदोलनात घडलेल्या घटनेचा हवाला दिला. त्यांनी विधानसभेत सांगितलं की, महिला आमदारांसोबतचं असं वर्तन वेठबिगार मजुरांपेक्षाही अधिक वाईट आहे. आंदोलनादरम्यान हुड्डा ट्रॅक्टर चालकाच्या जागेवर बसले होते आणि काँग्रेस आमदार हा ट्रॅक्टर रस्सीनं खेचत होत्या.

मनोहरलाल खट्टर ManoharLal Khattar यांनी याबाबतचा व्हिडिओ ट्विटरवरून शेअर केला आहे. व्हिडिओत त्यांना रडू कोसळल्याचं दिसत आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं की, महिलादिनी भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी महिला आमदारांबाबत संवेदनाहीनता दाखवली. त्यामुळं मला दु:ख झालं आहे.

मुख्यमंत्रिपदासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं नाव शर्यतीत !

रेखा जरे हत्याकांड प्रकरण : ॲड. उमेशचंद्र यादव यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

खासदार मोहन डेलकर आत्महत्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून FIR दाखल; राजकीय वातावरण तापलं

अखेर पोलिस अधिकारी सचिन वाझेंची मुंबईच्या गुन्हे शाखेतून उचलबांगडी, गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा

“शिवसेनेत सर्व्हे अन् प्रमुख पदासाठी मतदान झालं, तर उद्धव ठाकरे पक्षप्रमुखही राहणार नाहीत” ! ‘या’ भाजप नेत्याची उद्धव ठाकरेंवर टीका

Related Posts