IMPIMP

पतंजलीने लाँच केले कोरोनाचे नवीन औषध; बाबा रामदेव म्हणाले – ‘आता आमच्यावर कुणी प्रश्न उपस्थित करू शकत नाही’

by sikandershaikh
patanjali launches coronas new drug baba ramdev said now no one can question us

नवी दिल्ली : योगगुरू बाबा रामदेव यांनी आज कोरोनाचे नवीन औषध लाँच केले. पतंजलीचा (patanjali) दावा आहे की, नवीन औषध पुराव्यांवर आधारित आहे. नवीन औषधाच्या लाँचिंगवेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी उपस्थित होते. नवीन औषधाचे नाव सुद्धा कोरोनिल आहे. पतंजलीचे म्हणणे आहे की, कोरोनिल टॅबलेटने आता कोविडचा उपचार होईल.

आयुष मंत्रालयाने कोरोनिल टॅबलेटला कोरोनाचे औषध म्हणून मान्यता दिली आहे. पतंजलीचे म्हणणे आहे की, नवीन कोरोनिल औषध CoPP-WHO GMP सर्टिफाईड आहे. औषध लाँच करताना बाबा रामदेव यांनी म्हटले योग, आयुर्वेदाला रिसर्च बेस्ड ट्रीटमेंट पद्धतीने अवलंबले जात आहे.

कोरोनाचे नवीन औषध लाँच केल्यानंतर रामदेव म्हणाले, माझ्यावर मागील तीन दशकांपासून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले, जेव्हा मी म्हटले होते की, आजारांना तुम्ही नियंत्रित नव्हे, नष्ट करू शकता, आता सर्व सर्टिफिकेशनसह आमच्याकडे 250 पेक्षा जास्त रिसर्च पेपर आहेत, एकट्या कोरोनावर 25 रिसर्च पेपर आहेत, आता कुणीही जगात प्रश्न उपस्थित करू शकत नाही.

आचार्य बाळकृष्ण यांनी म्हटले की, कोरोनिलचा वापर लोक अगोदरपासून करत होते, परंतु आता डीजीसीएनंतर आम्हाला डब्लूएचओकडून अप्रूव्हल मिळाले आहे,
हे 154 देशांसाठी अप्रूव्हल मिळाले आहे, यानंतर आम्ही आता अधिकृतपणे कोरोनिलची निर्यात करू शकतो, आम्ही शास्त्रीय पद्धतीने कोरोनिलवर संशोधन केले.

तर, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी म्हटले, पतंजलीच्या संशोधनाचा देशाला फायदा होईल,
पण शास्त्रीयदृष्ट्या हे काम करण्यासाठी बाबा रामदेव आणि आचार्च बाळकृष्ण यांना धन्यवाद देतो,
जे आता शास्त्रीय पुरावा घेऊन पुन्हा जनतेसमोर आले आहेत,
यामुळे लोकांचा विश्वास निश्चिपणे वाढेल.

आयुर्वेद उपचार पद्धतीचे कौतूक करताना डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले की, कोरोना काळात आयुर्वेद पद्धतीवर लोकांचा विश्वास वाढला आहे,
कोरोनापूर्वी आयुर्वेदचे मार्केट दरवर्षी 15 टक्के वाढत होते,
परंतु कोरोनानंतर यामध्ये 50 ते 90 टक्केची उसळी आली आहे,
जगातील लोकांचा आयुर्वेदावरील विश्वास वाढत आहे.

यापूर्वी पतंजलीने (patanjali) 23 जून 2020 ला कोरोनासाठी कोरोनिल लाँच केले होते,
ज्यामध्ये 7 दिवसात कोरोनाच्या उपचाराचा दावा केला होता. परंतु, लाँच होताच हे औषध वादात सापडले होते.

Related Posts