IMPIMP

Video : 6 वर्षाच्या चिमुकलीने विचारला पंतप्रधानांना जाब; म्हणाली…

by omkar

नवी दिल्ली : सरकारसत्ता ऑनलाइन – viral video of 6 year girl | सोशल मीडियावर एका छोट्या मुलीचा व्हिडिओ वायरल होत आहे, ज्यामध्ये ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जास्त होमवर्क दिला जात असल्याची तक्रार करत आहे. व्हिडिओमध्ये मुलगी म्हणते, छोट्या मुलांना इतके काम दिले नाही पाहिजे. काश्मीरमध्ये राहणारी ही सहा वर्षांची मुलगी कोरोना काळात ऑनलाइन क्लासेस आणि शिक्षकांकडून देण्यात येणार्‍या कामामुळे कंटाळली आहे आणि यासाठी तिने पीएम मोदी यांना भावनिक आवाहन केले आहे.

‘कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका’ ! लसीकरणावरून केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टाकडून खरडपट्टी?

खुप वेळ चालतो ऑनलाइन क्लास

व्हिडिओत मुलगी म्हणते, ‘अस्सलामु अलैकुम मोदी साहेब, मी मुलगी बोलत आहे. मी सहा वर्षांची आहे, मी झूम क्लास बाबत बोलू शकते. 6 वर्षांची जी मुलं असतात त्यांना जास्त काम का देतात. अगोदर इंग्रजी, गणित, उर्दू, ईव्हीएस आणि त्यानंतर कम्प्यूटरचा क्लास. मला 10 वाजेपासून 2 वाजेपर्यंत क्लास अटेंड करावा लागतो. इतके काम तर मोठ्या मुलांकडे असते.

मुलीने पीएमकडे तक्रार करत म्हटले की, छोट्या मुलांवर इतका भार का टाकला जात आहे.
व्हिडिओच्या शेवटी सुद्धा तिने पीएम यांना मोदी साहेब म्हणून संबोधित केले आहे.
हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल झाला आहे.
कोरोना काळात शाळा बंद आहेत आणि मुलांचे ऑनलाइन वर्ग सुरू आहेत.
प्रत्येक वेळी मोबाइल किंवा लॅपटॉप समोर बसून मुले कंटाळली आहेत.

मनोज सिन्हा यांनी उचलले पाऊल
व्हिडिओ वायरल झाल्यानंतर जम्मू काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांनी अ‍ॅक्शन घेतली आहे.
त्यांनी लिहिले आहे की, खुपच निष्पापता पूर्ण तक्रार.
शाळकरी मुलांवरील होमवर्कचा भार कमी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाला 48 तासांच्या आत धोरण बनवण्याचे निर्देश दिले आहेत.
बालपणातील निष्पापणा देवाची भेट आहे आणि त्यांचे दिवस जीवंत, आनंदी आणि आनंदाने भरलेले असावेत.

Related Posts