IMPIMP

Health Benefits Of Banana Shake :आरोग्यासाठी केळी आणि दुधाचा ‘या’ पद्धतीनं करा वापर, याचे जबरदस्त फायदे करतील ‘हैराण’, जाणून घ्या

by bali123
health benefits of banana shake use bananas and milk in this way for health

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – केळीबरोबर दुधाचे सेवन करणे शरीरासाठी चांगले असते. विशेषतः मुलांना दुधात केळी banana दिली जातात. त्याचवेळी जे लोक वर्कआउट करतात त्यांना दूध आणि केळी banana एकत्र घेणे आवडते. आरोग्यासाठी त्याचे प्रचंड फायदे आहेत. त्यासाठी दूध आणि केळी आपल्याला व्यवस्थित वापरावे लागतील. जर वापर योग्य असेल तर बरेच फायदे होतात. केळी banana आणि दुधाचा शेक बनवून हे सेवन केले जाऊ शकते. शरीराला ऊर्जा देण्यासाठी हे खूप चांगले आहे. दूध आणि केळी एकत्रितपणे सेवन केल्यास काय फायदे होऊ शकतात हे जाणून घ्या.

चांगली झोप येते
केळीमध्ये ट्रिप्टोफॅन आढळतो, ज्यामुळे सेरोटोनिन स्त्राव होण्यास मदत होते. चांगल्या झोपेमध्ये हे खूप फायदेशीर आहे. ज्या लोकांना कमी झोप येते ते केळीचा शेक घेऊ शकतात.

रोगप्रतिकारकशक्ती वाढते
बनाना शेकमध्ये व्हिटॅमिन सी आढळते. व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारकशक्ती वाढवते. हे एकत्रितपणे पांढऱ्या रक्त पेशी वाढविण्यासाठी मदत करतात.

मूत्रपिंडाच्या समस्येवर मात केली जाते
शेकमध्ये असे काही घटक असतात, ज्यामुळे मिठाचे दुष्परिणाम काढून टाकले जातात. त्यामुळे मूत्रपिंड त्याचे कार्य योग्यरीत्या करते.

हृदयाचे आरोग्य चांगले राहते
केळीमध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे हृदयाशी संबंधित समस्या कमी होतात. त्याचबरोबर स्ट्रोकची शक्यता कमी होते.

कसे बनवाल केळीचा शेक
शेक करण्यासाठी जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत. दोन केळी घ्या आणि त्याचे तुकडे करा. त्यानंतर ३० सेकंद मिक्सरमध्ये एक कप दुधासह ढवळून घ्या. शेवटी त्यात दोन चमचे मध घाला. चवदार आणि निरोगी शेक तयार.

Fatty Liver Symptoms : शरीरामध्ये दिसणारे ‘ही’ 5 लक्षणे यकृतासाठी धोक्याची घंटा, जाणून घ्या उपाय

सकाळी उठल्यानंतर आळस येतो तर ब्रेकफास्टमध्ये ‘या’ गोष्टींचा समावेश करा, जाणून घ्या

Related Posts