IMPIMP

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी डबल खुशखबर ! प्रमोशनसह DA बाबत सुद्धा आली मोठी अपडेट

by nagesh
7th Pay Commission | 7th pay commission news central gov employees on da dearness allowance detail here

नवी दिल्ली : वृत्तसंस्था7th Pay Commission | केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांसाठी (Central Government Employees) दुहेरी आनंदाची बातमी आली आहे. तुम्ही स्वत: किंवा तुमच्या घरात केंद्र सरकारचे कोणतेही कर्मचारी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. पुन्हा एकदा लाखो कर्मचार्‍यांचे पगार वाढणार आहेत (Salary Hike). याचा लाभ सर्व कर्मचार्‍यांना मिळणार आहे. सरकारकडून कर्मचार्‍यांच्या प्रमोशनची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. (7th Pay Commission)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

रेटिंग आधारित असेल प्रमोशन
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्राकडून कर्मचार्‍यांसाठी अप्रायझल विंडो उघडण्यात आली आहे. ही विंडो 30 जूनपर्यंत खुली राहणार आहे. देय तारखेपर्यंत, कर्मचार्‍यांनी सेल्फ-असेसमेंट भरून अहवाल अधिकार्‍यांकडे पाठवावे. (7th Pay Commission)

कर्मचार्‍यांनी भरलेल्या सेल्फ-असेसमेंटवर अधिकार्‍याने दिलेल्या रेटिंगवरच प्रमोशनचा निर्णय घेतला जाईल.

 

सर्व कर्मचार्‍यांना मिळेल लाभ
EPFO सूत्रांचे म्हणणे आहे की अ‍ॅन्युएल परफॉर्मन्स असेसमेंट रिपोर्ट (APAR) मॉड्यूल तयार करण्यात आले आहे. लवकरच ऑनलाइन विंडोही सुरू होईल. त्यानंतर फायनल असेसमेंट पाठवले जाईल. केंद्रातील सर्व कर्मचारी असेसमेंट सायकलमध्ये येतील. अप्रायझल विंडो ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी कर्मचार्‍यांसाठी उघडत आहे.

 

अ‍ॅन्युअल अप्रायझलची तारीख नजीक
आर्थिक वर्ष 2021 – 22 साठी वार्षिक अप्रायझलची तारीख जवळ आली आहे. ते 31 जुलैपर्यंतच पूर्ण करायचे आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग (DoPT) नुसार, गुप ए, बी आणि सी च्या अ‍ॅन्युअल परफॉर्मन्स असेसमेंट रिपोर्टसाठी (APAR) विंडो उघडत आहे. कर्मचार्‍यांचे एपीआर थकीत असल्याने एपीआरचा लाभही मिळणार आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

31 जुलैपर्यंत पूर्ण होईल अप्रायझल प्रोसेस
डीओपीटीकडून केंद्रीय कर्मचार्‍यांना ऑनलाइन फॉर्म पाठवण्यात आल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. तसेच मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. कर्मचार्‍यांनी फॉर्ममध्ये मागितलेली माहिती भरून 30 जूनपर्यंत संबंधित असेसमेंट अधिकार्‍यांकडे जमा करायचे आहे.

ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 31 जुलैपर्यंतचा कालावधी लागणार आहे. गेल्या दोन वर्षांच्या कामगिरीच्या आढाव्यात झालेल्या विलंबाच्या तुलनेत यंदा वेळेत होणे अपेक्षित आहे.

 

जुलैमध्ये वाढणार 4 टक्के महागाई भत्ता !
केंद्रीय कर्मचार्‍यांनाही अप्रायझलसह महागाई भत्त्याचा लाभ मिळणे अपेक्षित आहे.
केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता सरकार दरवर्षी जानेवारी आणि जुलैमध्ये दोनदा वाढवते.
जानेवारीचा महागाई भत्ता मार्चमध्ये जाहीर करण्यात आला आहे.

महागाई भत्त्याचा दुसरा हप्ता जुलैमध्ये जाहीर केला जाऊ शकतो.
एआयसीपीआय इंडेक्सचा डेटा जुलैमध्ये 4 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. यापूर्वी तो 3 टक्क्यांनी वाढून 34 टक्के झाला होता.
जुलैमध्ये महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढवला तर तो 38 टक्के होईल.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission central employees annual appraisal assessment till 30th june dearness allowance

 

हे देखील वाचा :

Lemon Alternatives | लिंबूच्या जागी तुम्ही ‘या’ गोष्टींचाही करू शकता वापर, जाणून घ्या

IRCTC Luggage Rules | आता विमान प्रवासाप्रमाणे ट्रेनमध्ये जादा बॅग नेण्यासाठी भरावे लागेल शुल्क, रेल्वेने लागू केले नवीन नियम

Rakesh Jhunjhunwala | बिगबुलने 5 दिवसात ‘या’ कंपनीचे विकले 25 लाख शेअर, गुंतवणुकदारांचे मोठे नुकसान

 

Related Posts