IMPIMP

जर हरवले असेल Aadhar Card आणि नसेल रजिस्टर्ड मोबाइल नंबर तरी सुद्धा डाऊनलोड करू शकता आधार, जाणून घ्या सोपी पद्धत

by nagesh
Aadhaar Card Security | aadhaar card use these services to secure personal data on aadhaar card know detail

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  Aadhar Card | जर तुमचे आधार कार्ड (Aadhar Card) हरवले तर आधारमध्ये रजिस्टर्ड मोबाइल नंबरच्या मदतीने ते डाऊनलोड करता येते. परंतु जर तुमच्याकडे रजिस्टर्ड मोबाइल नंबरही नसेल आणि आधार कार्ड हरवले तरीसुद्धा आधार कार्ड पुन्हा मिळवण्यात काहीही अडचण येत नाही UIADI ने यासाठी सोपी पद्धत सांगितली असून ती जाणून घेवूयात.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

मोबाइल नंबर रजिस्टर्ड नसतानाही असे करा आधार रिप्रिंट

 

स्टेप 1 : सर्वप्रथम आधार कार्डच्या अधिकृत वेबसाइटवर जा. तुम्ही या लिंकवर सुद्धा क्लिक करू शकता. : www.uidai.gov.in.

 

2 : आधार सेवा टॅबमध्ये Order Aadhaar Reprint (ऑर्डर आधार रीप्रिंट) वर क्लिक करा.

 

3 : यानंतर तुमच्या कम्प्यूटर स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल. येथे तुमचा 12 अंकांचा आधार नंबर किंवा 16 अंकांचा वर्च्युअल आयडी नंबर टाका. याच्या खालील कॉलममध्ये सिक्युरिटी कोड टाका. (Aadhar Card)

 

4 : आता Mobile number is not Registered वर टिक करा. नंतर नवा मोबाइल नंबर देण्याचे ऑपशन मिळेल. तेथे नवा मोबाइल नंबर टाका. यानंतर एक ओटीपी येईल. या पर्यायात आधारची माहिती पाहणे आणि व्हेरिफाय करण्याचा पर्याय नसेल.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

5 : आता नव्या मोबाइल नंबरवर आलेला ओटीपी नोंदवा. नियम आणि अटी वाचा. सहमत म्हणून क्लिक करा.

 

6 : आता स्क्रीनवर नवे पेज उघडेल. जेथे 50 रुपये पेमेन्ट करावे लागेल. यासाठी पेमेन्ट मोड सिलेक्ट करावा लागेल. या 50 रूपयात स्पीड पोस्ट आणि जीएसटी दोन्ही आहे. पेमेन्ट करण्यासाठी युपीआय, डेबिट, क्रेडिट दोन्ही ऑपशन मिळतील.

 

7 : पेमेन्ट केल्यानंतर तुम्हाला याची स्लिप मिळेल, जी तुम्ही डाऊनलोड करा.

 

8 : पेमेन्ट केल्यानंतर तुमचे आधार कार्ड पुन्हा प्रिंट करण्यात येईल आणि 15 दिवसांच्या आत स्पीड पोस्टने तुमच्या पत्त्यावर पाठवले जाईल. (Aadhar Card)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : Aadhaar Card | know how to get aadhar card without registered mobile number here step by step process

 

हे देखील वाचा :

ST workers strike | खाजगी बसेस पुन्हा धावणार; राज्य सरकारने घेतली सुरक्षेची हमी

Pune Crime | फसवणूक प्रकरण ! एम. जी. एन्टप्रायजेसच्या अलनेश सोमजीच्या पोलीस कोठडीत वाढ तर पत्नी डिंपल सोमजीचा जामीनासाठी अर्ज

PF Balance | इंटरनेट आणि मोबाइल डेटा न वापरता चुटकीत जाणुन घ्या आपला PF बॅलन्स, अतिशय सोपी आहे ‘ही’ पद्धत

 

Related Posts