IMPIMP

PF Balance | इंटरनेट आणि मोबाइल डेटा न वापरता चुटकीत जाणुन घ्या आपला PF बॅलन्स, अतिशय सोपी आहे ‘ही’ पद्धत

by nagesh
PF Balance | you can check pf balance without internet or mobile data check balance via sms missed call

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  – मोदी सरकार (Modi Government) ने तुमच्या PF खात्यात (PF account) किती पैसे ट्रान्सफर (PF transfer) केले आहेत हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला आता इंटरनेट किंवा मोबाइल डेटाची (Internet Or Mobile Data) आवश्यकता नाही. हे काम तुम्ही विना इंटरनेट सुद्धा करू शकता. केवळ मोबाइलवरून एक मिस्ड कॉल किंवा एसएमएस करून तुम्ही बॅलन्स (PF Balance) जाणून घेवू शकता.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

विना इंटरनेट जाणून घेऊ शकता PF बॅलन्स

 

1- SMS द्वारे जाणून घ्या बॅलन्स

 

एसएमएसने सुद्धा आपला पीएफ अकाऊंटचा बॅलन्स सहज जाणून घेवू शकता.
यासाठी तुम्हाला तुमचा युएएन माहित असायला हवा.
सोबतच तो अ‍ॅक्टिव्ह असावा. एसएमएस सर्वप्रथम EPFOHO UAN HIN टाइप करून 7738299899 वर पाठवावा लागेल.
ज्यानंतर तुम्हाला हिंदीमध्ये मॅसेज येईल.
ज्यामध्ये तुमच्या पीएफ अकाऊंटमध्ये जमा रक्कमेची पूर्ण माहिती असेल.

 

2- मिस्ड कॉलद्वारे जाणून घ्या डिटेल्स

 

पीएफ अकाऊंटचा बॅलन्स एका मिस्ड कॉलने जाणून घेऊ शकता.
यासाठी आपल्या अकाऊंटमध्ये रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 011-22901406 वर एक मिस्ड कॉल द्यावा लागेल.
ज्यानंतर तुम्हाला ईपीएफओकडून एक एसएमएस येईल.
ज्यामध्ये तुम्हाला आपल्या पीएफ अकाऊंटमध्ये जमा रक्कमेची संपूर्ण माहिती मिळेल

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

ऑनलाइन असा जाणून घेवू शकता बॅलन्स

 

3- वेबसाईटद्वारे जाणून घ्या बॅलन्स

 

यासाठी https://passbook.epfindia.gov.in/MemberPassBook/Login वर लॉग-इन करा.
आता युएएन आणि पासवर्ड द्वारे लॉग-इन करा. यानंतर डाऊनलोड व्ह्यू पासबुकच्या ऑपशनवर क्लिक करा.

 

4- उमंग अ‍ॅपद्वारे जाणून घ्या बॅलन्स

 

प्ले स्टोरवरून उमंग अ‍ॅप डाऊनलोड करा. या अ‍ॅपवर अनेक सरकारी सेवा उपलब्ध आहेत.
यामध्ये ईपीएफओ ऑपशन निवडल्यानंतर एम्प्लॉई सेंट्रीक सर्व्हीस निवडा. आता युएएन नंबर टाका.
यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी प्राप्त होईल. तुम्ही व्ह्यू पासबूक अंतर्गत ईपीएफ बॅलन्स चेक करू शकता. (PF Balance)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

आले आहेत व्याजाचे पैसे

 

सरकारने अगोदरच आर्थिक वर्ष 2020-21 साठी पीएफवर 8.5 टक्के व्याज ट्रान्सफर करण्याच्या प्रस्तावावर हिरवा झेंडा दाखवला आहे.
लेबर मिनिस्ट्रीने सुद्धा या निर्णयावर आपली सहमती दिली आहे. आता EPFO सबस्क्रायबर्सच्या खात्यात 8.5 टक्के व्याज जमा करत आहे. (PF Balance)

 

Web Title : PF Balance | you can check pf balance without internet or mobile data check balance via sms missed call

 

हे देखील वाचा :

Disha Parmar-Rahul Vaidya | अनोख्या अंदाजात दिशाचा वाढदिवस होतोय साजरा; पती राहुल वैद्यने शेअर केले दोघांचे रोमँटिक फोटो !

ED Raid | नवाब मलिकांच्या मागे ED चा ससेमिरा? महाराष्ट्र वक्फ बोर्डातील घोटाळ्याप्रकरणी 7 ठिकाणी छापेमारी

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 75 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts