IMPIMP

Aadhaar-PAN Card Linking | आधार कार्ड पॅनशी लिंक केलं आहे का?; 1 जुलैपासून भरावा लागेल दुप्पट दंड, जाणून घ्या

by nagesh
PAN- Aadhaar Link | pan aadhaar link how to check status of pan card and aadhaar card status know process

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Aadhaar -PAN Card Linking | आधार कार्ड (Aadhar Card) हे भारतीय नागरीकांचे एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. खासगी आणि सरकारी कामामध्ये आधार कार्डची आवश्यकता असते. त्याशिवाय कोणतेही काम होत नाही. त्याचबरोबर आधार कार्डबाबत सरकार वेळोवेळी अपडेट देत असते. अनेक दिवसांपासून आधार पॅन लिंक (Aadhaar-PAN Card Linking) करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. आधार पॅन लिंकची अंतिम मुदत 30 जून 2022 रोजी संपत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याआगोदर आधार पॅन लिंकची अंतिम मुदत 31 मार्च 2022 होती. तसेच, नंतर 500 रुपयाच्या उशिरा दंडासह 30 जून 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर, जर पॅनकार्ड धारक त्याचा आधार क्रमांक त्याच्या पॅन कार्डशी अद्यापही जोडला नसेल तर त्याला त्याचा पॅन आधारशी उशिराने लिंक केल्याबद्दल जवळपास 1 हजार रुपयाचा दंड भरावा लागणार आहे. म्हणजेच, 30 जूनपर्यंत आधारशी पॅन लिंक करण्यासाठी 500 रुपये दंड भरावा लागणार होता. यानंतर प्रक्रिया उशिराने केल्यास 1000 रुपये दंड भरावा लागेल. (Aadhaar-PAN Card Linking)

 

दरम्यान, आधारला पॅनशी लिंक न केल्यास पॅनकार्ड निष्क्रिय होईल असे सरकारकडून यापूर्वी सांगण्यात आले होते. मात्र, 31 मार्च 2023 पर्यंत असे अजिबात होणार नसल्याचे सीबीडीटीने खुलासा केला आहे. तसेच, 1 एप्रिल 2022 नंतरही दंड भरून आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करता येणार आहे. तसेच, जर पॅन कार्ड आधारशी लिंक केलेले नसेल तर तुम्हाला म्युच्युअल फंड, डिमॅट खाते, बँक खाते उघडण्यास अडचणी येऊ शकतात.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

असं करा लिंक –

आयकर ई-फायलिंग पोर्टल https://incometaxindiaefiling.gov.in/ उघडा.

त्यावर नोंदणी करा (आधी केले नसल्यास).

तुमचा पॅन (कायम खाते क्रमांक) हा तुमचा वापरकर्ता आयडी असेल.

यूजर आयडी, पासवर्ड आणि जन्मतारीख टाकून लॉग इन करा.

एक दुसरी विंडो उघडेल जी तुम्हाला तुमचा पॅन आधारशी लिंक करण्यास सांगेल.

जर पॉप अप विंडो उघडत नसेल तर मेनूबारवरील ‘प्रोफाइल सेटिंग्ज’ वर जा आणि ‘लिंक आधार’ वर क्लिक करा.

PAN नुसार, नाव, जन्मतारीख आणि लिंग यासारख्या तपशीलांचा उल्लेख आधीच केला जाईल.

तुमचा आधार आणि पॅन कार्ड तपशील सत्यापित करा.

तपशील जुळत असल्यास, तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि “आता लिंक करा” बटणावर क्लिक करा.

एक पॉप-अप संदेश तुम्हाला कळवेल की तुमचा आधार तुमच्या पॅनशी यशस्वीरित्या लिंक झाला आहे.

 

Web Title :- Aadhaar-PAN Card Linking | haventt linked pan aadhar card yet link the documents by june 30 or you will have to play double penalty from july 1

 

हे देखील वाचा :

Pravin Darekar On Pawar Family | ‘पवारांमधला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार नेमका कोण? हे तुम्हीच घरच्या घरी ठरवा’ – प्रविण दरेकर

Mutual Fund | म्युच्युअल फंड गुंतवणुकदारांसाठी आता हे करणे गरजेचे, जाणून घ्या संपूर्ण प्रकिया !

e-Aadhaar Card | विनाआधार क्रमांक सुद्धा डाऊनलोड करू शकता ई-आधार कार्ड, येथे पहा एक-एक स्टेप

 

Related Posts