IMPIMP

e-Aadhaar Card | विनाआधार क्रमांक सुद्धा डाऊनलोड करू शकता ई-आधार कार्ड, येथे पहा एक-एक स्टेप

by nagesh
Aadhaar Card | aadhaar card download aadhaar card frauds uidai update uidai website

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाe-Aadhaar Card | आधार क्रमांक हा UIDAI द्वारे जारी केलेला एक विशिष्ट ओळख क्रमांक आहे. तो 12 अंकी असून तुमच्या बायोमेट्रिक्ससह इतर माहिती त्यात उपलब्ध आहे. ज्या कार्डवर आधार क्रमांक आढळतो त्याला आधार कार्ड म्हणतात. (e-Aadhaar Card)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

लोक अनेकदा आधार कार्डची हार्ड कॉपी त्यांच्यासोबत बाळगतात, परंतु काही कारणास्तव तुमच्याकडे आधारची हार्ड कॉपी नसेल आणि तुम्हाला आधार कार्डची नितांत गरज असेल, तर तुम्ही ई-आधार कार्ड डाउनलोड करू शकता.

 

हे करण्याचे 2 मार्ग आहेत. प्रथम तुम्ही आधार क्रमांकाद्वारे ई-आधार कार्ड डाउनलोड करू शकता आणि दुसरे म्हणजे जन्मतारखेनुसार देखील ई-आधार डाउनलोड करू शकता. कसे ते जाणून घेवूयात. (e-Aadhaar Card)

 

जन्मतारखेनुसार आधार कार्ड कसे करावे डाउनलोड

1. सर्वप्रथम येथे दिलेल्या लिंकवर जा https://myaadhaar.uidai.gov.in/retrieve-eid-uid
2. आता तुमचे पूर्ण नाव, मोबाईल नंबर किंवा ई-मेल आयडी आणि सिक्युरिटी कोड टाका.
3. Send OTP वर क्लिक करा
4. दिलेल्या जागेत तुमच्या मोबाईल किंवा ई-मेल आयडीवर प्राप्त झालेला OTP एंटर करा आणि Verify OTP वर क्लिक करा.
5. आधार नोंदणी क्रमांक तुम्हाला फोनवर पाठवला जाईल.
6. यानंतर UIDAI वेबसाइटवरील ई-आधारच्या पेजवर जा
7. येथे 28 अंकी नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा आणि सेंड ओटीपीवर क्लिक करा.
8. आधार कार्ड तुमच्या फोन किंवा लॅपटॉपवर PDF फाईलच्या स्वरूपात डाउनलोड केले जाईल.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आधार क्रमांकाद्वारे ई-आधार कसे करावे डाऊनलोड

जर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक माहित असेल तर तुम्ही ई-आधार अगदी सहज डाउनलोड करू शकता.
1. आधारच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
2. आधार क्रमांकाचा पर्याय निवडा
3. तुमचा आधार क्रमांक, सिक्युरिटी कोड नोंदवा आणि Send OTP वर क्लिक करा. तुमच्या मोबाईल नंबरवर ओटीपी पाठवला जाईल.
4. आता पेजवर दिलेल्या जागेवर ओटीपी टाका.
5. नंतर Verify आणि Download वर क्लिक करा
6. पडताळणी झाल्यानंतर, तुमचे ई-आधार PDF फाईलमध्ये डाऊनलोड केले जाईल. ते पासवर्ड संरक्षित असेल.
7. फाईल उघडण्यासाठी 8 अंकी पासवर्ड टाकावा लागेल जो तुमच्या नावाची (कॅपिटलमध्ये) 4 अक्षरे आणि तुमचे जन्म वर्ष आहे.

विशेष म्हणजे, योजनांचा लाभ थेट बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यासाठी सरकार आधार क्रमांकाचा वापर करत आहे.

 

Web Title :- e-Aadhaar Card | step by step e aadhar card download process with aadhar number and without aadhar number

 

हे देखील वाचा :

Purchase Of Cotton Seeds | शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! कापूस बियाणे विक्रीवरील बंदी उठवली; ठाकरे सरकारचा निर्णय

Ajit Pawar | वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांना अजित पवारांकडून खबरदारीच्या सूचना; म्हणाले – ‘कोरोना वाढतोय…’

Rajesh Tope | ‘मास्क वापरण्याचं आवाहन, परंतु सक्ती नसणार’; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

 

Related Posts