IMPIMP

Abdul Sattar | ‘मी सुरक्षित’ अब्दुल सत्तारांचे सूचक विधान

by nagesh
Abdul Sattar | sattar says i am safe abdul sattar indicative statement on resignation

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   – मागील काही दिवस कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. त्यांनी राष्ट्रवादीच्या (NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्यानंतर सर्व स्तरांतून त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. तसेच विरोधी पक्षांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यावर आता अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी सूचक विधान केले आहे.

 

औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी हजेरी लावली. यावेळी ते बोलत होते. सत्तार यांनी सुप्रिया सुळे प्रकरणात माफी देखील मागितली होती. पण विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्तार यांनी त्यांच्या राजीनाम्याबाबत सूचक विधान केले आहे. ‘मी सुरक्षित’ असे सत्तार (Abdul Sattar) म्हणाले आहेत. त्यामुळे सत्तार राजीनामा देणार नाहीत किंवा मुख्यमंत्री त्यांचा राजीनामा मागणार नाहीत, असे तर्क वितर्क सध्या राज्यात लावले जात आहेत. सुप्रिया सुळे यांनी शिष्टमंडळ राज्यपालांकडे जाऊन अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी करणार असल्याचे सांगितले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आज विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत सत्तारांनी पीक विम्यासंबंधित आढावा घेतला आहे.
बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सुप्रिया सुळे यांच्यावरील टीकेवरुन राजीनाम्याची मागणी केली जात आहे,
या प्रश्नाला उत्तर देणे त्यांनी टाळले आहे.
पण त्यांनी केवळ मी सुरक्षित येवढेच माफक विधान यावेळी केल्याने तर्क वितर्कांना सुरुवात झाली आहे.

 

Web Title :- Abdul Sattar | sattar says i am safe abdul sattar indicative statement on resignation

 

हे देखील वाचा :

Chandrashekhar Bawankule | संजय राऊत सुटल्यावर जल्लोष करणे योग्य नाही, त्यांना फक्त जामीन मिळाला आहे – चंद्रशेखर बावनकुळे

Deoli-Wardha Road Accident | देवळी-वर्धा मार्गावर विचित्र अपघात, सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू

Yashomati Thakur | अफवा पसरविणे भाजपचे काम आहे, स्वातंत्र्यांच्या काळात देखील ते तेच करत होते – यशोमती ठाकूर

 

Related Posts