IMPIMP

Yashomati Thakur | अफवा पसरविणे भाजपचे काम आहे, स्वातंत्र्यांच्या काळात देखील ते तेच करत होते – यशोमती ठाकूर

by nagesh
Yashomati Thakur | It is BJP's job to spread rumours, they were doing the same even during independence

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   काँग्रेस (Congress) नेते, खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात निघालेली कन्याकुमारी ते काश्मीर ‘भारत जोडो’ पदयात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. त्यांच्या यात्रेचे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे. त्यांच्या यात्रेला महाविकास आघाडीतील नेत्यांनी देखील हजेरी लावली आहे. तर दुसरीकडे त्यांच्या यात्रेवर भाजप (BJP) आणि शिंदे गट (Shinde Group) टीका करत आहेत. त्यांच्यावर आता काँग्रेसच्या नेत्या आणि आमदार यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी भाष्य केले आहे. अफवा पसरविणे हे भाजपचे कामच आहे. त्यांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील अफवाच पसरविल्या होत्या, असे यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) म्हणाल्या आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

भाजपने भारत जोडो यात्रा भारतात न काढता पाकिस्तानात काढावी असे म्हंटले होते. त्यावर ठाकूर म्हणाल्या, भाजप आणि त्यांच्या संलग्न सर्व संस्थांचे अफवा पसरविणे येवढेच काम आहे. आणि तेच ते लोक करत आहेत. आताच नाही, तर स्वातंत्र्याच्या काळात देखील त्यांनी अफवा पसरविल्या आहेत. त्यामुळे काहीही बोलून चालणार नाही. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात देशात मोठे आंदोलन उभे केले गेले आहे. आणि आता ते पुढे जात आहे. या आंदोलनाला जनसामान्यांची मोठ्या प्रमाणात साथ आहे. अनेक जनसामान्य लोक राहुल गांधी यांच्यासोबत चालत आहेत. आम्ही देखील त्यांच्यासोबत आहोत.

 

राहुल गांधी यांनी भारतात यात्रा न काढता त्यांनी पाकिस्तान आणि काश्मीरमध्ये यात्रा काढायला पाहिजे होती, असे भाजपने म्हंटले होते.
भारत कुठेच तुटलेला नाही. भारत जर तुटला असेल, तर तो काँग्रेसच्या काळातच तुटला होता.
पाकिस्तान आणि बांग्लादेश वेगळा होऊन भारत तुटला होता. काश्मीरचा भाग भारतापासून तुटला होता.
त्यामुळे त्यांनी तिकडे जाऊन भारत जोडो यात्रा सुरु करायला पाहिजे होती, असे भाजप नेते म्हणत आहेत.
त्यांना यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

 

Web Title :- Yashomati Thakur | It is BJP’s job to spread rumours, they were doing the same even during independence

 

हे देखील वाचा :

Uddhav Thackeray | “केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीव…”; राऊतांच्या भेटी नंतर उद्धव ठाकरेंचे वक्तव्य

Pune Crime | ‘त्या’ तरुणीचा खून एकतर्फी प्रेमातून, खून करणाऱ्या आरोपीची मुळशीत आत्महत्या

T-20 World Cup | इंग्लंडनं अभ्यास केला सूर्यकुमारचा पेपर आला हार्दिकचा, फलंदाजांचा उतावळेपणा पडला महागात

Virat Kohli | विराट कोहलीची मोठ्या विश्वविक्रमाला गवसणी, क्रिकेट विश्वात अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू

 

Related Posts