IMPIMP

Chandrashekhar Bawankule | संजय राऊत सुटल्यावर जल्लोष करणे योग्य नाही, त्यांना फक्त जामीन मिळाला आहे – चंद्रशेखर बावनकुळे

by nagesh
Chandrasekhar Bawankule | chandrashekhar bawankule warning to anil deshmukh over bjp party joining offer

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या गोरेगाव पत्राचाळ भूखंड गैरव्यवहार
प्रकरणातून जामीनावर सुटका झाली आहे. त्यावर शिवसेनेत (Shivsena) आनंदाचे वातावरण आहे. संजय राऊत यांच्या सुटकेवर भाजप (BJP)
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी भाष्य केले आहे. संजय राऊत यांना फक्त जामीन मिळाला आहे, पूर्ण सुटका
झाली नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले. यावेळी त्यांनी इतरही विविध मुद्यांवर भाष्य केले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ओबीसी आरक्षण (OBI Reservation) यापूर्वीच सर्वोच्च न्यायलयाने दिले आहे. त्यात 93 नगरपालिका आल्या नाहीत. म्हणून त्यावर पुन्हा सुनावणी घेण्यात येत आहे. पण त्या 93 नगरपालिका देखील या नवीन आरक्षणात समावून घेणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयात अपेक्षित आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझल खानाच्या कबरीला (समाधी) लागून मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. ते आमच्या शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) पाडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मी त्यांचे अभिनंदन करतो. गेली अनेक वर्षे आमची हीच मागणी राहिली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे देखील आम्ही ही मागणी केली होती. पण राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसच्या (Congress) दबावाला बळी पडून ते काही करत नव्हते. पण आता शिंदे-फडणवीस सरकारने ते पाडले आहे. ते झाले नसते, तर प्रतापगडाचे (Pratapgad) महत्व कमी झाले असते. त्यामुळे ते अतिक्रमण पाडून चांगले काम झाले आहे.

 

संजय राऊत यांना फक्त या प्रकरणात जामीन मिळाला आहे. त्यानंतर देखील मोठ्या कारवाया कराव्या लागतात.
अनेक कागदपत्रे न्यायालयात सादर करावी लागतात. त्यामुळे त्यांनी येवढ्यातच जल्लोष साजरा करु नये.
त्यांची या प्रकरणातून अद्याप सुटका झाली नाही, केवळ जामीन मिळाला आहे, असे देखील बावनकुळे म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

Web Title :- Chandrashekhar Bawankule | It is not right to celebrate Sanjay Raut’s release, he just got bail

 

हे देखील वाचा :

Deoli-Wardha Road Accident | देवळी-वर्धा मार्गावर विचित्र अपघात, सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू

Pune Crime | बंडगार्डन आणि फरासखाना पोलीस ठाण्यच्या हद्दीत अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई, मॅस्केलाईन आणि एमडी जप्त

Uddhav Thackeray | “केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीव…”; राऊतांच्या भेटी नंतर उद्धव ठाकरेंचे वक्तव्य

 

Related Posts