IMPIMP

ACB Trap News |  50 हजार रुपये लाच घेताना पुण्यातील महावितरणचा सहायक अभियंता अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

by sachinsitapure
ACB

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – सरकारी विद्युत ठेकेदाराकडून 50 हजार रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) पुण्यातील महावितरण कार्यालयाच्या (MSEDCL) बाणेर उपकेंद्रातील सहायक अभियंत्याला (Assistant Engineer) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Trap News) रंगेहाथ पकडले आहे. रविंद्र नानासाहेब कानडे Ravindra Nanasaheb Kanade (वय-37) असे लाच घेताना पकण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. पुणे एसीबीच्या पथकाने (ACB Trap News) ही कारवाई शुक्रवारी (दि.1) महावितरण कार्यालय उपकेंद्र बाणेर (Sub Center Baner) येथील कर्यालयाच्या आवारात केली.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत एका ठेकेदाराने पुणे एसीबीकडे (ACB Trap News) तक्रार केली आहे. तक्रारदार हे सरकारी विद्युत ठेकेदार (Government Electricity Contractor) आहेत. त्यांना आर.एम.सी. प्लांटसाठी लागणाऱ्या विद्युत पुरवठा करण्याचा ठेका मिळाला होता. हे काम शासकीय योजना 1.3 टक्के तत्वाच्या नियमानुसार पूर्ण केले आहे. या कामाचा पुर्णत्वाचा दाखला देण्यासाठी उपकेंद्र बाणेर कार्यालयातील सहायक अभियंता रविंद्र कानडे यांनी तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपये लाचेची मागणी (Demanding Bribe) केली.

तक्रारदार यांनी याबाबत पुणे एसीबी (Pune ACB Trap News) कार्यालयात कानडे विरुद्ध तक्रार केली. एसीबीच्या पथकाने 28, 29 आणि 31 ऑगस्ट रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता तक्रारदार यांनी नियमानुसार पूर्ण केलेल्या कामाचा पूर्णत्वाचा दाखला देण्यासाठी कानडे यांनी 50 हजार रुपये लाचेची मागणी करुन लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार पथकाने शुक्रवारी उपकेंद्र बाणेर कार्यालयाच्या परिसरात सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम घेताना रविंद्र कानडे याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल करण्यात आहे. पुढील तपास पुणे एसीबीचे पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर (PI Pravin Nimbalkar) करीत आहेत.

ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (Pune ACB)
पोलीस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe),
अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे (Addl SP Sheetal Janve) यांच्या मार्गदर्शनाखाली
पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.

Related Posts