IMPIMP

Accident News | पुण्यातून सुरु झालेला तो प्रवास ठरला अखेरचा, आई-मुलाचा बसमध्ये गुदमरुन दुर्दैवी मृत्यू

by nagesh
Jalna Crime News | hair braid stuck in threshing machine woman farmer dies

इंदूर : वृत्तसंस्थाAccident News | पुण्याहून (Pune) उज्जैनला (Ujjain) निघालेल्या आई आणि मुलाचा अशोका ट्रॅव्हल्स (Ashoka Travels) गाडीमध्ये संशयास्पद मृत्यू (Mother-Child Death) झाल्याची माहिती समोर येत आहे. आई आणि मुलाचा गाडीमध्ये गुदमरुन मृत्यू झाला. दोघांनाही बसमध्ये गुदमरल्याची (Suffocation Death) तक्रार होती. परंतु बसच्या वाहकाने याकडे लक्ष दिले नाही. बसमध्ये लावलेल्या अग्निशामक यंत्रातून गॅस गळती (Gas Leak) झाल्याने या दोघांचा मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. याबाबत संयोगितागंज पोलीस (Sanyogitaganj Police) तपास करीत आहेत. (Accident News)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

काय आहे घटना ?
उज्जैन येथे दीपिका संदीप पटेल Deepika Sandeep Patel (वय – 38) या शिक्षिका म्हणून काम करत होत्या. त्या रविवारी रात्री मुलगा आदित्य राज Aditya Raj (वय – 11) आणि आणि आई पुष्पा (वय – 56) याच्यासह अशोका ट्रॅव्हल्सच्या एसी बसने (एमपी 07 पी 5097) पुण्याहून उज्जैनला निघाले होते. दोघांना गुदमरल्याचा त्रास होत असल्याने त्यांनी याबाबत तक्रार केली होती. परंतु, गॅसचा वास येत असल्याचे सांगून वाहकाने याकडे दुर्लक्ष केले. मात्र, ते इंदूरला (Indore) पोहचेपर्यंत दीपिका आणि मुलगा आदित्य यांची प्रकृती ढासळली. (Accident News)

दोघांची प्रकृती बिघडल्यावर बस वाहकाने त्यांना इंदूरच्या मध्यभागी सोडले आणि त्यांना रिक्षातून रुग्णालयात पाठवले. त्याठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. यानंतर मृतदेहांचे एम वाय हॉस्पिटलमध्ये (M.Y. Hospital) शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी पोलीस बसचालक आणि वाहकाचा जबाब नोंदवणार आहेत. तसेच शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समजू शकणार आहे.

 

ट्रॅव्हल्सच्या संचालकांनी सांगितले…
ट्रॅव्हल्स कंपनीचे संचालक राजेश शर्मा (Director Rajesh Sharma) यांनी सांगितले की, महिलेने प्रकृती बिघडल्याची तक्रार केली होती.
बसमध्ये इतर 30 प्रवासी प्रवास करत होते. यापैकी एकालाही त्रास झाला नाही.
महिलेनंतर तिच्या मुलालाही उलट्या आणि जुलाब होऊ लागले. दोघांनाही गाडीत उलट्या झाल्याने त्यांना केबिनमध्ये हलवण्यात आले.
वाटेत एका ठिकाणी गाडी थांबली. इंदूरला पोहचेपर्यंत त्यांची प्रकृती जास्तच बिघडली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Accident News | mother and child died due to suffocation in bus indore

 

हे देखील वाचा :

Nora Fatehi | काय सांगता ! होय, नोरा फतेही करतेय लग्न; सोशल मीडियावर होणाऱ्या नवऱ्याचा फोटो जोरदार व्हायरल

Amol Mitkari On Raj Thackeray | अमोल मिटकरींनी राज ठाकरेंचा ‘खाज’ ठाकरे म्हणून उल्लेख करत केली मिमिक्री; म्हणाले…

Pune Crime | तडीपार असताना खुनाचा प्रयत्न करुन फरार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक

 

Related Posts