IMPIMP

Aditya Thackeray | आदित्य ठाकरेंचं ट्वीट; म्हणाले – ‘या बातम्या खोट्या आहेत, शिवसेना पक्षात फक्त…’

by nagesh
Maharashtra Political Crisis | bjp atul bhatkhalkar slams shiv sena aditya thackeray over protest against metro car shed in aarey

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Aditya Thackeray | आगामी स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुका फेब्रुवारी-मार्चमध्ये होणार आहेत. दरम्यान याचा कार्यक्रम अद्याप आयोगाकडून जाहीर झाला नाही. दरम्यान आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केलीय. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांत आरोपांच्या फैरी झडताना दिसत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी महापालिका निवडणुकीच्या कामाला लागा असा आदेश शिवसैनिकांना दिला आहे. ‘जिल्हा विकास योजनेतील निधीतून केलेली कामे मार्गी लावा, त्यांचा अहवाल तयार करा आणि शहरात शिवसेनेने केलेली कामे आणि निर्णय लोकांपर्यंत पोहोचवा,’ असं मुख्यमंत्री ठाकरे यानी विभागप्रमुखांना सांगितलं आहे. तसेच, शिवसेनेकडून विशिष्ट वयोगटातील उमेदवारांनाच तिकीट दिलं जाणार अशी चर्चा असतानाच आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून (Shiv Sena) विशिष्ट वयोगटातील उमेदवारांनाच तिकीट दिलं जाणार असल्याची चर्चा जोर धरत आहे.
मुंबई आणि ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना 50 वर्षांपेक्षा जादा वय असणाऱ्या काही नगरसेवकांना डावलणार असून त्यांच्या
जागी युवकांना संधी देणार असल्याची चर्चा आहे.
परंतु, शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी ट्वीटच्या माध्यमातून या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

आदित्य ठाकरे म्हणाले, ‘विशिष्ट वयोगटाला निवडणुकीचे तिकीट देण्याबाबत गेले दोन-तीन दिवस मी काही बातम्या बघत आहे.
या बातम्या खोट्या आहेत. शिवसेना पक्षात फक्त जनतेची अहोरात्र सेवा करणाऱ्यांनाच इतर कोणताही भेदभाव न करता तिकीट मिळतं,’ असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Aditya Thackeray | shivsena minister aditya thackeray tweet mumbai municipal corporation election

 

हे देखील वाचा :

Post Office Gram Suraksha Yojana | केवळ 50 रुपये जमा करा, पोस्ट ऑफिसच्या ‘या’ सुपरहिट स्कीमध्ये मिळतील 35 लाख; जाणून घ्या सविस्तर

LIC Jeevan Labh Policy | एलआयसीची ‘ही’ योजना दररोज 260 रुपयांच्या गुंतवणुकीवर 20 लाख रुपये देईल, जाणून घ्या अटी आणि नियम

Makar Sankranti 2022 | मकर संक्रांतीचे पौराणिक महत्त्व काय आहे? या दिवशी भीष्म पितामह यांनी केला होता देह त्याग

 

Related Posts