IMPIMP

Pune Crime | दहीहंडी उत्सवात गोळीबार, कोयत्याने वार; सिंहगड रोडवरील वडगाव बुद्रुक येथील घटना

by nagesh
Nanded Firing Case | nanded firing case woman congress worker firing in nanded three people

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | दहीहंही उत्सवात (Dahi Handi-2022) पूर्ववैमनस्यातून दोन गुन्हेगार (Pune Criminals) टोळ्यांमधील वैमनस्य पुन्हा उफाळून आले. एका टोळीने दुसर्‍या टोळीतील गुन्हेगारावर डोक्यात कोयत्याने वार केले तर, दुसर्‍या गुन्हेगाराने हवेत गोळीबार (Firing In Pune) केला. सिंहगड रोडवरील (Sinhagad Road) वडगाव बुद्रुक (Vadgaon Budruk, Pune) येथील समर्थनगर येथील दहीहंडी उत्सवात शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता ही घटना घडली. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या घटनेत शुभम मोरे (Shubham More) हा जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव बुद्रुक येथील सराईत गुन्हेगार चेतन ढेबे (Chetan Dhebe) व किरण चांदणे (Kiran Chandane) यांच्यात पूर्वीपासून वाद आहेत. समर्थनगर येथे दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शुक्रवार सायंकाळी त्या ठिकाणी दोन्ही गटाचे गुन्हेगार एकत्र आले. त्यावेळी चेतन ढेबे व त्यांच्या साथीदारांनी किरण चांदणे याच्या टोळीतील शुभम मोरे याच्यावर कोयत्याने डोक्यात वार केले. त्याचवेळी झालेल्या गोंधळात एकाने हवेत गोळीबार केला. गोळीबाराच्या आवाजाने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत गुन्हेगार पसार झाले होते. सिंहगड रोड पोलीस (Sinhagad Road Police) अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Two groups fired, knifed at Dahihandi festival; Incident at Vadgaon Budruk on Sinhagad Road

 

हे देखील वाचा :

MLA Rajan Salvi | ‘आमची निष्ठा मातोश्री चरणी कायम, मला खोक्याची गरज नाही’, शिंदे गटात जाण्याच्या चर्चांवर राजन साळवींकडून स्पष्टीकरण

Dahi Handi-2022 | ‘आता कसं वाटतंय, मोकळं-मोकळं वाटतंय’, दहीहंडी उत्सवात फडणवीस यांची तुफान फटकेबाजी (व्हिडीओ)

Irrigation scam | सिंचन घोटाळा प्रकरणात ‘या’ अधिकाऱ्याची एन्ट्री, केला गंभीर आरोप म्हणाले – ‘गेल्या 10 वर्षात घोटाळ्याची चौकशीच झाली नाही’

Aditya Thackeray | ’50 थर लावले की थरकाप झालाय हे सर्वांना माहितेय’ – आदित्य ठाकरे

 

Related Posts