IMPIMP

Ahmednagar Crime | ‘बिग मी इंडिया’चा पुण्यातील 62 जणांना 7 कोटींना गंडा, अहमदनगर पोलिसांच्या तपासात निष्पन्न

by nagesh
Pune Crime News | Pune Crime News : Lonikand Police Station - Fraud of a senior citizen by using fake purchase documents on the pretext of renting a place

अहमदनगर : सरकारसत्ता ऑनलाइनAhmednagar Crime | बिग मी इंडिया कंपनीच्या (Big Me India Company) माध्यमातून अल्पावधीत पैसे दुप्पट करुन देण्याचे आमिष (Lure) दाखवून हजारो लोकांना गंडा घालणार्‍या सोमनाथ राऊतने (Somnath Raut) पुण्यातील (Pune) 62 जणांना तब्बल 7 कोटी रुपयांना चूना लावला आहे. अहमदनगर पोलीस (Ahmednagar Police) दलातील आर्थिक गुन्हे शाखेने (Crime Branch) केलेल्या तपासात ही माहिती (Ahmednagar Crime) समोर आली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

एका लाखाला दररोज 300 रुपये व्याज अशी जाहिरात करुन सोमनाथ राऊत याने मोठ्या प्रमाणावर ठेवी गोळा केल्या होत्या. सोमनाथ राऊत याने पत्नी सोनिया राऊत (Sonia Raut), वंदना पालवे Vandana Palve (रा. केडगाव), सुप्रिया आरेकर Supriya Arekar (रा. बुर्‍हाणनगर), प्रीतम शिंदे Pritam Shinde (रा. पुणे), प्रीती शिंदे Preeti Shinde (रा. नगर) आणि शॉलमन गायकवाड Shalman Gaikwad (रा. सावेडी) यांना संचालक (Director) करुन बिग मी इंडिया प्रा. लि. या कंपनीची डिसेंबर 2019 मध्ये स्थापना केली होती. त्या अंतर्गत “फंड पे” नावाचे वॉलेट सुरु केले. पतसंस्था, मोबाईल रिचार्ज, टीव्ही चॅनल रिचार्ज, वीज बिल भरणा आदी सेवा देण्यास सुरुवात केली. (Ahmednagar Crime)

 

कंपनीत एक लाख रुपये गुंतवणूक (Investment) केल्यास दरमहा 300 ते दीड हजार रुपयांचा परतावा देण्याचे आमिष गुंतवणूकदारांना दाखविण्यात आले होते. पाचशे ते एक हजार रुपयांची गुंतवणूक करणारे सुमारे साडेचार लाख गुंतवणुकदारांकडून त्याने पैसे गोळा केले होते. या कंपनीने 29 ऑगस्ट 2021 मध्ये सर्व व्यवहार बंद केले. नगर व पुणे येथील कार्यालय बंद केले. सतीश खोडवे Satish Khodve (रा. कागल, जि़. कोल्हापूर Kolhapur) यांनी नगरमधील तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) फिर्याद दिली. तेव्हापासून सोमनाथ राऊत फरार होता.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

पुण्यात राऊत याने कार्यालय सुरु केले होते. लोकांनी त्याच्या कंपनीत गुंतवणूक केली होती.
नगर पोलिसांनी केलेल्या तपासात पुण्यातील 62 लोकांची 7 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
लोकांची रक्कम निधी अर्बन बँकेत (Nidhi Urban Bank) गुंतविण्याचा राऊत याचा इरादा होता.
परंतु, त्याआधीच त्याचे बिंग फुटले व फरार झाला होता. बिग मी इंडिया च्या माध्यमातून आणखी किती जणांची फसवणूक झाली आहे. याचा नगर पोलीस तपास करीत आहेत.

 

Web Title :- Ahmednagar Crime | Big Me India raises Rs 7 crore to 62 people in Pune Ahmednagar police probe

 

हे देखील वाचा :

Economic Offences Wing (EoW) Raid | खाण विभागाच्या उपसंचालकांच्या घरावर छापे

Mumbai High Court | भाजप नेत्याला हायकोर्टाचा दणका ! आधी 2 लाख भरा मगच सुनावणी घेऊ

Weight Loss drink | रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या ‘हे’ आश्चर्यकारक ड्रिंक, वेगाने वितळू लागेल पोटाची चरबी

White Hair Problem | पांढर्‍या केसांच्या समस्येवर रामबाण उपचार, घरातच करा ‘हे’ 3 महत्वाचे उपाय, जाणून घ्या

 

Related Posts