IMPIMP

Economic Offences Wing (EoW) Raid | खाण विभागाच्या उपसंचालकांच्या घरावर छापे

by nagesh
Economic Offences Wing (EoW) Raid | bihar patna EoW raid 3 locations deputy director mining department

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाEconomic Offences Wing (EoW) Raid | बिहारचे खाण विभागाचे उपसंचालक सुरेंद्र कुमार सिन्हा यांच्या विरोधात अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्या तक्रारींची दखल घेत आर्थिक गुन्हे शाखेने (Economic Offences Wing (EoW) Raid) सिन्हा यांच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी घरात नोटांचे बंडल आढळल्याने आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची झोपच उडाली. सुमारे ८९ लाखांच घबाड मिळून आले आहे. दरम्यान, औरंगाबादसह पाटणा येथील तीन ठिकाणी आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

सुरेंद्र कुमार सिन्हा यांच्याकडे बेहिशोबी मालमता असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेने सिन्हा यांच्या पाटणा येथील रुपसपूर परिसरातील निवासस्थानासोबतच विकास भवन येथील कार्यालयावर देखील छापेमारी केली आहे. छाप्यात अनेक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. काही बेहिशोबी मालमत्ता समोर आली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २००६ मध्ये सिन्हा यांची खाण विभागात अधिकारी म्हणून पोस्टिंग झाली होती. (Economic Offences Wing (EoW) Raid)

 

सुरेंद्र कुमार सिन्हाची कसून चौकशी
एका हिंदी वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार रेतीचे अवैध उत्खनन, वाहतूक व साठवणूक तसेच अवैध बांधकामांना आळा घालण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्याशिवाय सुरेंद्र कुमार सिन्हा यांची कसून चौकशी सुरू आहे.

 

दरम्यान, ओडिशामध्येही अशीच एक घटना समोर आली होती. एका सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचे घबाड सापडलं होत.
सुंदरगड अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी बिस्वजित मोहापात्रा यांच्या निवासस्थानी दक्षता विभागाने छापेमारी केली होती.
त्यांच्याकडे उत्पन्नाच्या स्त्रोतांपेक्षा जास्त मालमत्ता आढळली होती. या छाप्यात दक्षता विभागाने तीन लाख रुपये, दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त मुदत ठेवी आणि इतर स्थावर मालमत्ता शोधून काढल्या. दरम्यान, दक्षता विभागाने एक निवेदन जारी केले. त्यामध्ये संपूर्ण कारवाईचा उल्लेख केला आहे. त्यानुसार, भुवनेश्वरमध्ये एक दुमजली इमारत आणि एक फ्लॅट, १० भूखंड आणि २ कोटी रुपयांहून अधिक बँक ठेवी, विमा आणि इतर गोष्टी सापडल्या आहे. छापेमारीत ३ लाखांहून अधिक रोख आणि ३५० ग्रॅम सोनेही जप्त करण्यात आले आहे. तसेच म्युच्युअल फंडमध्ये १८ लाख गुंतवले आहेत. इतकच नाही तर मोहपात्रा यांनी पत्नीच्या नावाने भुवनेश्वरमधील बलियंता येथे सिमेंटचा व्यवसाय सुरू केला होता.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Economic Offences Wing (EoW) Raid | bihar patna EoW raid 3 locations deputy director mining department

 

हे देखील वाचा :

Mumbai High Court | भाजप नेत्याला हायकोर्टाचा दणका ! आधी 2 लाख भरा मगच सुनावणी घेऊ

Weight Loss drink | रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या ‘हे’ आश्चर्यकारक ड्रिंक, वेगाने वितळू लागेल पोटाची चरबी

White Hair Problem | पांढर्‍या केसांच्या समस्येवर रामबाण उपचार, घरातच करा ‘हे’ 3 महत्वाचे उपाय, जाणून घ्या

 

Related Posts