IMPIMP

Ajit Pawar | बटन दाबताना महागाई लक्षात राहिली पाहिजे, अजित पवारांची सत्ताधाऱ्यांवर खोचक शब्दात टीका

by nagesh
Ajit Pawar | ajit pawar baramati visit statement on development work

बारामती : सरकारसत्ता ऑनलाईन – महागाई (Inflation) कशी वाढत चालली आहे, ती सतत तुमच्या डोक्यात रहावी, म्हणून मी तुमच्या लक्षात आणून देत आहे. यापुढे बटन दाबताना ही महागाई लक्षात राहिली पाहिजे, अशा मिश्किल शब्दात राष्ट्रवादीचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी वाढत्या महागाईवरुन सत्ताधाऱ्यांवर फटकेबाजी केली. बारामती येथे रविवारी ज्येष्ठ नागरिक निवास येथील वाढीव भोजन कक्ष व करमणूक कक्षाच्या इमारतीचे उद्घाटन अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, येथील एका कक्षाचे काम काही वर्षांपूर्वी 50 हजारात झाले होते. मात्र त्याचे नुतनीकरण करण्यासाठी तीन लाख रुपये खर्च आला. महागाई कशी वाढत चालली आहे. हे तुमच्या लक्षात रहावे यासाठी मी सांगतो आहे. त्यामुळे येथून पुढे बटन दाबताना महागाई लक्षात ठेवा, असे त्यांनी सांगितले. आगामी निवडणुकांमध्ये महागाईचा मुद्दा प्रभावी ठरणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले.

 

सुनेत्रा पवारांची घेतली फिरकी

यावेळी बोलताना अजित पवारांनी लोकसंख्येचे प्रमाण (Population) व त्यातील तरुणांचा टक्का व ज्येष्ठाचा टक्का किती प्रमाणात आहे याची माहिती दिली. सध्या भारतात तरुणांची संख्या मोठी आहे. भारतीयांचे सरासरी आयुर्मान 28 वर्ष इतके आहे. देशात 60 पेक्षा जास्त ज्येष्ठांची संख्या 10 टक्के आहे. देशात 13 कोटी 50 लाख लोकं 60 वर्षाच्या पुढची आहेत. यामध्ये माझा देखील नंबर लागतो आणि लवकरच सुनेत्राचा (Sunetra Pawar) सुद्धा नंबर लागणार आहे, असे म्हणताच उपस्थितांमध्ये खसखस पिकली.

चपटीसाठी विकले पुलाच्या कठड्यावरील भाले

बाबूजी नाईकवाड्याजवळील नदीपात्रातून कसब्याकडे जाण्यासाठी नवीन पुलाचे बांधकाम सध्या सुरु आहे.
या पुलाच्या संरक्षक कठड्यावर लोखंडी सळईच्या भाल्याचे नक्षीकाम करण्यात आले होते.
परंतु आज या पुलाची पाहणी करताना यातील भाले गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
यासंदर्भात कार्यक्रमात बोलताना पवार म्हणाले, भाले गायब झाल्याबद्दल विचारले असता एकाने सांगितले
दादा एक भाला काढला की शंभर रुपये मिळतात. शंभर रुपये मिळाले की 50 रुपयाला एक दारुचा तुकडा म्हणजे चपटी मिळते.
एका भाल्यात दोन चपट्या मिळतात, त्याचे भागतं. आपण करतोय काय कशाचा कशाला मेळ नाही, असा किस्सा अजित पवार यांनी यावेळी सांगितला.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

Web Title : Ajit Pawar | ajit pawar baramati visit statement on development work

Related Posts