IMPIMP

Ajit Pawar | शिंदे गटाच्या गाड्या राज्याबाहेर कशा गेल्या? अजित पवारांनी सांगितला नेमका घटनाक्रम

by nagesh
Pune Lok Sabha Bypoll Election | congress is upset because ncp leader ajit pawar claimed the pune lok sabha constituency

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Shiv Sena Leader Eknath Shinde) आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी बंडखोरी
(Rebel MLA) करुन राज्याला धक्का दिला आहे. एवढ्या मोठ्या संख्येने शिवसेनेचे आमदार राज्याबाहेर जात होते, मात्र, याची कुणालाच कल्पना
नव्हती. शिंदे गटाच्या (Shinde Group) गाड्या राज्याबाहेर जात असताना कमालीची गुप्तता बाळगण्यात आली. हे सगळं कसं घडलं? याबाबत विरोधी
पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी नेमका घटनाक्रम सांगितला. पुण्यातील एका वृत्त समुहाने घेतलेल्या मुलाखतीत अजित पवार (Ajit Pawar)
बोलत होते.

 

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीला आता जवळपास दहा महिने उलटली आहेत. शिंदेंच्या बंडखोरीवर भाष्य करताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, एकनाथ शिंदे बंडखोरी करणार आहेत. याची कुणकुण आम्हाला लागली होती. याबाबत आम्ही शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या कानावर घातले होते. मात्र, आमच्या हातात राज्य असूनही काही बाबी इतक्या व्यवस्थित घडल्या की आम्ही काहीच करु शकलो नाही. खरं तर, ठाणे जिल्ह्यात कोण अधिकारी असावेत? हे ठरवण्याचा सर्व अधिकार उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना दिला होता. त्यामुळे तेथील पोलीस आयुक्त (Police Commissioner), ठाण्याचे आयुक्त (Thane Commissioner) किंवा तेथील सहा नगरपालिकांचे आयुक्त, ग्रामीणचे एसपी वगैरे नेमण्याचा सगळा अधिकार एकनाथ शिंदे यांना दिला होता.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अजित पवार पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे 20 जून रोजी जेव्हा बाहेर पडले, तेव्हा त्यांनीच नेमलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना सुरतला सुरक्षितपणे पोहोचवण्याचं काम केलं. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले की, शिंदे गटाच्या गाड्या जिथे असतील तिथून त्या गाड्या परत वळवा आणि त्यांना मातोश्रीवर आणा. पण अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवर उद्धव ठाकरेंनी सही केली असली तरी त्या सह्या करुन घेण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केले होते त्यामुळे सगळे अधिकारी शिंदे यांच्याशी एकनिष्ठ राहिले. शिंदे गटाच्या सगळ्या गाड्या पद्धतशीर बाहेर पडल्यानंतर अधिकारी म्हणाले, अजून कुठे काही दिसत नाही. अस सगळं घडलं. त्यानंतर सुरत-गुवाहाटी-गोवा हे सगळ्यांना माहितच आहे, असं अजित पवार म्हणाले.

 

 

Web Title :- Ajit Pawar | how eknath shinde groups cars went out of maharashtra ajit pawar big statement uddhav thackeray

 

हे देखील वाचा :

Pune PMC – Ajit Pawar | नगर रस्त्यावरील दुमजली उड्डाणपूल थेट विमाननगरपर्यंत करणार ! अजित पवार यांनी केली पाहणी; बीआरटी काढण्याची सुचना

Maharashtra Political News | ‘2024 ची कशाला वाट बघू… मी आताच दावा करतो’, अजित पवारांचं सूचक विधान

Pune PMC Property Tax | पुणे महानगरपालिका : मिळकत करातील 40 टक्के सवलतीचा अध्यादेश राज्य शासनाने काढला ! देखभाल दुरूस्तीसाठीची 2010 पासूनची 5 टक्के वजावटही माफ; 1 एप्रिलपासून देखभाल दुरूस्तीची 10 टक्के आकारणी

 

Related Posts