IMPIMP

Eknath Shinde Government | राज्यात आता ‘शिंदेशाही’ ! एकनाथ शिंदे सरकारनं बहुमत जिंकले

by nagesh
Shinde-Fadnavis Government | Another failure of the Shinde-Fadnavis government, another project lost in the hands of Maharashtra?

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनआज एकनाथ शिंदे सरकारनं (Eknath Shinde Government) आपली दुसरी परीक्षाही पास केली आहे. विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीच्या लढाईत शिंदे-फडणवीस सरकारनं (Eknath Shinde Government) बाजी मारली आहे. 164 मतांनी सभागृहात बहुमत सिद्ध (Majority) करत एकनाथ शिंदे यांनी ही चाचणी पास केली आहे. काल विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक (Assembly Speaker Election) जिंकून सरकारनं पहिला विजय मिळवला होता. पण त्यांची खरी कसोटी होती. आज सकाळी 11 वाजता विधिमंडळाचे कामकाज सुरु झाल्यानंतर आवाजी मतदानाने बहुमत चाचणी पार पडली. यात एकनाथ शिंदे सरकारच्या प्रस्तावाच्या बाजूने 164 तर विरोधात 99 मतं पडली.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

महाराष्ट्राच्या राजकारणात 10 दिवसांच्या बंडखोरीनंतर मोठा बदल घडवणारे शिवसेनेचे नेते (Shivsena Leader) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नव्या सरकारने अखेरीस बहुमताची चाचणी पास केली आहे.
शिंदे सरकारच्या बाजूने शिवसेना बंडखोर आणि भाजपच्या आमदारांनी (BJP MLA) मतदान केलं. सरकारने 144 बहुमताचा आकडा पार केला आहे.
शिंदे सरकारला (Eknath Shinde Government) एकूण 164 तर विरोधात 99 मतं पडली. तर 3 आमदार तटस्थ राहिले.
यावेळी राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसचे (Congress) पाच मोठे नेते बहुमत चाचणीला गैरहजर असल्याचे समोर आले.
विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar), अशोक चव्हाण (Ashok Chavan), संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांना सभागृहात येता आले नाही.
सभागृहाची दार बंद झाल्यामुळे पाच नेत्यांना आतमध्ये येता आले नाही. त्यामुळे हे पाचही नेते मतदानाला मुकले.

 

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी बहुमताची आकडेवारी मोजून दाखवली आणि सर्वात जास्त मतदान हे शिंदे सरकारच्या बाजूने असल्याचे जाहीर केले.
त्यानंतर भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांनी एकच घोषणा केली.

 

Web Title :- Eknath Shinde Government | cm eknath shindes government has a majority of 164 vots win

 

हे देखील वाचा :

Small Saving Schemes | पुन्हा वाढले नाहीत PPF, NSC, सुकन्या समृद्धी योजनेचे व्याजदर

Pune Cyber Crime | सायबर चोरट्यांचा नेत्र चिकित्सक महिलेला दोन लाखांना गंडा; क्रेडिट कार्डला सर्व्हिस चार्ज लागत असल्याचे सांगून केली फसवणूक

Eknath Shinde Devendra Fadnavis Government | होय, ‘ED’ मुळेच आमचे सरकार आले.., सभागृहात चक्क फडणवीसांनीच सांगितले

 

Related Posts