IMPIMP

Ajit Pawar | ‘मी कधीच दुजाभाव केला नाही, निधीत काटछाट केली नाही’ अजित पवारांचे बंडखोर आमदारांना उत्तर

by nagesh
Ajit Pawar | ncp leader ajit pawar answer to shiv sena mlas allegation and said support to uddhav thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनमहाराष्ट्रामध्ये जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामध्ये महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi Government) प्रमुख उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) राष्ट्रवादीचा (NCP) पूर्णपणे पाठींबा असेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले. अजित पवार यांनी विकासकामांसाठी निधी दिला नाही, अशी तक्रार शिवसेनेच्या आमदारांची (Shivsena MLA) आहे. यावर अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, मी कधीच निधीच्या बाबतीत दुजाभाव केला नाही, निधीत काटछाट केली नाही, असेही त्यांनी सांगितले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

राष्ट्रवादी काँग्रेसची आज मुंबई वाय.बी. चव्हाण सेंटर (Y.B. Chavan Center) इथे बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार, खासदार उपस्थित होते. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया दिली. दरम्यान, बंडखोरी करणाऱ्यांना किंमत मोजावी लागेल. हे सरकार टीकावे यासाठी सगळे प्रयत्न आपण करु, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी सांगितले.

सगळा निधी दिला आहे

आमच्या सरकारमधील काही मित्रपक्ष थोडं वेगळं विधान करत आहेत. अजित पवार असं करतात तसं करतात. मला महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचं आहे, सरकार अडीच वर्षापूर्वी अस्तित्वात आलं. त्यावेळी 36 पालकमंत्री नेमले. त्यामध्ये एकतृतीयांश प्रत्येक पक्षाचे नेमले गेले. त्यांना निधी देत असताना कुठेही काटछाट केली नाही. जो अर्थसंकल्पात (Budget) मंजूर करण्यात आलेला होता. तो आमदार निधी, डोंगरी विकास निधी आणि डीपीसी निधी सगळा दिला. मी कधीच दुजाभाव केला नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांना पूर्णपणे पाठिंबा

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार आणि खासदारांची बैठक झाली.
सध्या महाराष्ट्रात जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे त्याबाबत माझ्या पाठोपाठ जयंत पाटीलही (Jayant Patil) सांगतील.
महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख उद्धव ठाकरे यांना पूर्णपणे पाठिंबा देवून हे सरकार टिकवण्याचे प्रयत्न करणार आहे.
मी दुपारी देखील मुख्यमंत्र्यांशी बोललो. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यासोबत बोललो.
माझी मीडियाला विनंती करतो, या पेक्षा कोणतीही भूमिका राष्ट्रवादीची नाही. शिवसेनेत काही प्रश्न निर्माण झाले आहेत.
काही आमदारांनी वेगळी भूमिका मांडली आहे. जिकडे जे आमदार आहेत त्यांना आवाहन करण्याचं काम सुरु आहे.
आमची भूमिका आघाडी सरकारला टिकवण्याची आहे. सर्व आमदार आमच्या बाजूने आहेत, असा दावा अजित पवार यांनी केला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Ajit Pawar | ncp leader ajit pawar answer to shiv sena mlas allegation and said support to uddhav thackeray

हे देखील वाचा :

Sanjay Rathod | शिवसेनेचे आमदार संजय राठोड पत्नीचा शब्द धूडकावून गुवाहाटी दाखल

Nana Patole On Ajit Pawar | काँग्रेसचा उप मुख्यमंत्र्यांवर मोठा आरोप, म्हणाले – ‘अजित पवार शिवसेनेच्या आमदारांना त्रास द्यायचे’

Sanjay Raut | संजय राऊतांचे सूचक ट्विट, म्हणाले – ‘गुलामी पत्कारण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ’

Related Posts