IMPIMP

Ajit Pawar | ‘कोरोना’च्या संकटाचे गांभीर्य ओळखून राज्य सरकारने तातडीने उपाययोजना राबवाव्यात; विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी

by nagesh
Ajit Pawar | this is not the culture of maharashtra this should not happen in the legislature ncp leader ajit pawar rahul gandhi protest

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन   Ajit Pawar | गेल्या तीन वर्षात जगभरात ‘कोरोना’ने थैमान घातले आहे. चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. चीनमध्ये पुन्हा लॉकडाऊन करावा लागला. या पार्श्वभूमीवर राज्यात काय खबरदारी, उपाययोजना केली जात आहे ? असा सवाल करत ‘कोरोना’ संकटाबाबतचा प्रशासनाला अनुभव आहे, महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोरोनाची परिस्थिती चांगल्याप्रकारे हाताळली होती. ‘कोराना’च्या नवीन व्हेरिएंटचा प्रसार होऊ नये म्हणून सर्वांनी एकत्र येऊन काळजी घेण्याची आवश्यकता असून राज्य सरकारने ‘कोरोना’चा विषय गांभीर्याने घ्यावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सभागृहात आज केली. याला सकारात्मक प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या माध्यमातून तातडीने टास्क फोर्स उभारणार असल्याची माहिती दिली.

 

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, कोरोनाच्या काळात मार्च महिन्यात दुबईतून आलेल्या जोडप्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढला. चीन, जपान, कोरिया, ब्राझिल या देशांत कोरोनाचा नवीन व्हेरिएंट सापडत आहे आणि कोविडची साथ पुन्हा सुरू झाली आहे. चीनमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. बेड शिल्लक नाहीत म्हणून तिथे कारमध्ये रुग्णांना अ‍ॅडमिट करण्याची वेळ आली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या आरोग्य सचिवांनी काल नव्या व्हेरिएंटविषयी तपास आणि काळजी घेण्याचे आवाहन सर्व राज्यांना केले आहे. त्यात आपलेही राज्य असेल.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

तर या सर्व गोष्टींचा विचार करता चीनमधील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी
हायपॉवर कमिटी किंवा टास्क फोर्स आणि जगभरात काय केले जात आहे
याचा अभ्यास करण्यासाठी आपण समिती नेमणार आहात का ? नवीन व्हेरिएंटचा प्रसार होऊ नये म्हणून सर्वांनी एकत्र येऊन काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
बाकी कोणती यंत्रणा तात्काळ उभी करायची याचा अनुभव प्रशासनाला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या सरकारने कोरोनाची परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली होती.
त्यामुळे ‘कोरोना’चे गांभीर्य ओळखून राज्य सरकारने तातडीने पाऊले उचलण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली.

 

Web Title :- Ajit Pawar Recognizing the seriousness of the ‘Corona’ crisis, the state government should implement urgent measures; Opposition leader Ajit Pawar’s demand

 

हे देखील वाचा :

Winter Session 2022 | भुजबळांच्या मुंबईबाबतच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर अजित पवारांनी व्यक्त केली दिलगीरी; म्हणाले…

Pune Crime | मित्राकडून उसने घेतलेले 1 कोटी 88 लाख परत न देणाऱ्या व्यावसायिकास अटक; न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

khadakwasla Dam | खडकवासला धरणाच्या पाण्यात बुडून तरुण-तरुणीचा मृत्यू, मृत्यूचे कारण अस्पष्ट

 

Related Posts