IMPIMP

Winter Session 2022 | भुजबळांच्या मुंबईबाबतच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर अजित पवारांनी व्यक्त केली दिलगीरी; म्हणाले…

by nagesh
Winter Session 2022 | maharashtra asembly winter session controversy over chagan bhujbal statement on mumbai watch video

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन   राज्याचे हिवाळी अधिवेशन (Winter Session 2022) हे सध्या नागपूर येथे सुरू आहे. यात विविध प्रश्नांवर विरोधक सरकारला जाब विचारत आहेत. मागील दोन दिवस हे प्रचंड गदारोळात गेले. विविध मुद्यांवर विरोधी पक्षांनी सरकारला कोंडीत पकडले. तसाच काहीसा गोधळ आज (बुधवारी) देखील दोन्ही सभागृहांमध्ये पहायला मिळाला. यात पुरवणी मागण्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी मुंबईबाबत एक वक्तव्य केले आहे. त्यावरून छगन भुजबळ चांगलेच अडचणीत सापडले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

छगन भुजबळ यांनी मुंबईचा उल्लेख सोन्याचं अंड देणारी कोंबडी असा केला. त्याचबरोबर त्यांनी भाजपच्या आमदार मनीषा चौधरी यांचा उल्लेख एकेरी केला. त्यामुळे छगन भुजबळ हे चांगलेच अडचणीत सापडले. यानंतर मनीषा चौधरी या आक्रमक झाल्या. वाद वाढताना दिसताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मध्यस्थी करत दिलगीरी व्यक्त केली. तसेच आमदार छगन भुजबळ यांनी देखील आपले शब्द मागे घेतले.

 

या सर्व प्रकाराबाबत झालं असं की, छगन भुजबळ यांनी मुंबईचा उल्लेख सोन्याची अंडी देणारी कोंबडी असा केला. नंतर मनीषा चौधरी यांनी भुजबळांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. त्यावर भुजबळांनी मनीषा चौधरींना उद्देशून ए बस खाली, बस खाली असं बोलल्याचा आरोप भाजप आमदार योगेश सागर यांनी केला.

 

योगेश सागर म्हणाले, ‘तुम्ही सरस्वती, सावरकर, साधू संतांचा अपमान करणार. अपमानाची मोनोपोली आहे का? मुंबईने तुम्हाला महापौर, आमदार केलं, ओळख मिळवून दिली, त्यांच्याबद्दल असे बोलता. हा फक्त मनीषा चौधरी नाही तर महिलांचा अपमान आहे. त्यामुळे भुजबळांनी माफी मागितली पाहिजे.’ असे भाजप आमदार योगेश सागर म्हणाले.

 

त्यावर अजित पवारांनी स्पष्टीकरण दिले. भुजबळांना खाली बसा म्हणतं, मुंबई सर्वांची आहे,
मुंबईबाबत कुणीही असे वक्तव्य करू शकत नाही. असे विरोधीपक्षनेते अजित पवार म्हणाले.
मात्र तरीही सत्ताधारी आमदारांकडून गोंधळ घालण्यात आला. शेवटी या प्रकराबाबत अजितदादांनी दिलगीरी व्यक्त केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

‘महिलांना ३३ टक्के आरक्षण आम्हीच दिले. आणि हे आरक्षण ५० टक्क्यांपर्यंत देखील आम्हीच नेले.
महिलांना सन्मानाने वागणूक मिळावी, अशी आमची भूमिका आहे.
पण जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगीरी व्यक्त करतो असे
अजितदादा याबाबत सभागृहात बोलताना म्हणाले. त्याचबरोबर भुजबळांनी देखील आपले शब्द मागे घेतले.

 

Web Title :- Winter Session 2022 | maharashtra asembly winter session controversy over chagan bhujbal statement on mumbai watch video

 

हे देखील वाचा :

Pune Crime | मित्राकडून उसने घेतलेले 1 कोटी 88 लाख परत न देणाऱ्या व्यावसायिकास अटक; न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

Devendra Fadnavis | जुनी पेन्शन योजना लागू करता येणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

khadakwasla Dam | खडकवासला धरणाच्या पाण्यात बुडून तरुण-तरुणीचा मृत्यू, मृत्यूचे कारण अस्पष्ट

 

Related Posts