IMPIMP

Ajit Pawar | संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणण्यास नकार देणाऱ्या अजित पवारांची रवानगी पाकिस्तानात करा, भाजपच्या माजी आमदाराचा हल्लाबोल

by nagesh
Ajit Pawar | send ajit pawar in pakistan says bjp former mla narendra pawar over statement sambhaji maharaj is not dharmveer

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – विधानसभेत बोलत असताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्याविषयी भाष्य केले होते. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते, असे अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटले होते. यानंतर भाजप (BJP) नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार (Former MLA Narendra Pawar) यांनी अजित पवारांची रवानगी पाकिस्तानात करावी अशी मागणी केली आहे. यावर आता राष्ट्रवादीच्या (NCP) गोटातून काय प्रतिक्रिया येतात हे पहावे लागेल.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नरेंद्र पवार म्हणाले, अजित पवार (Ajit Pawar) यांना छत्रपती शिवाजी महाराज
(Chhatrapati Shivaji Maharaj) आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास माहिती नसणे, ही गोष्ट दुर्दैवी आहे. छत्रपतींचा इतिहास माहिती नसलेल्यांना महाराष्ट्रात आणि देशात राहण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे अजित पवार यांची पाकिस्तानला (Pakistan) रवानगी करण्यात यावी, अशी मागणी नरेंद्र पवार यांनी केली.

 

अजित पवार हे छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर मानायला तयार नाहीत.
त्यांना हिंदुस्थानातून हाकलून लावलं पाहिजे. त्यांची रवानगी पाकिस्तानात केली पाहिजे.
मी त्यांच्या वक्तव्याचा निषेध करणार नाही. तर त्यांना पाकिस्तानमध्ये पाठवण्याची मागणी करत आहे.
त्यांना भारतात राहण्याचा कोणताही हक्क नाही, असे नरेंद्र पवार यांनी म्हटले आहे.

 

Web Title :- Ajit Pawar | send ajit pawar in pakistan says bjp former mla narendra pawar over statement sambhaji maharaj is not dharmveer

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | ‘मोठा भाई झालास का’? ‘थर्टी फस्ट’ला वर्चस्वातून 2 गुंडाच्या टोळ्यात राडा, उत्तमनगरमधील घटनेत 7 जणांना अटक

Nysa Devgan | काजोल-अजयच्या लेकीचा बोल्ड अंदाज, दुबईतील सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल

Pune Crime News | 6 महिन्याच्या बाळाचा सहारा घेवुन मोबाईल चोरणारी माहिला समर्थ पोलिसांच्या जाळ्यात; 12 महागडे हॅन्डसेट जप्त

 

Related Posts