IMPIMP

Amit Deshmukh | अमित देशमुखांचा भाजप प्रवेश?; भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…

by nagesh
Amit Deshmukh | vilasrao deshmukh son congress mla amit deshmukh rumors about joining bjp chandrashekhar bawankule reacts

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  महाविकास आघाडीतील नेत्यांचा पक्ष पूर्ण रिकामा होईल. भाजपमध्ये मोठे नेते समाविष्ट होणार आहेत. पक्षप्रवेशाचे बॉम्बस्फोट होणार आहेत. असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केला होता. तसेच लातूर मधून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र अमित देशमुख (Amit Deshmukh) हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी सूचक विधान केल. (Amit Deshmukh)

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

औरंगाबाद येथे पत्रकारांशी संवाद साधताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ‘सगळे जण भाजपमध्ये येतील, यात बरीच मोठीमोठी नावे समाविष्ट आहेत, आता फक्त वेळ आणि ठिकाण ठरवायचं आहे. प्रवेशाचे बॉम्बस्फोट होतील, महाराष्ट्राला धक्का बसेल एवढे प्रवेश होतील.’ अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. (Amit Deshmukh)

 

दुसरीकडे, अमित देशमुखांच्या (Amit Deshmukh) संभाव्य भाजप प्रवेशाला संभाजी पाटील निलंगेकर यांनी विरोध दर्शवला आहे. लातूरचे प्रिन्स – अमित देशमुख हे कधीही जनतेचे प्रश्न घेऊन लोकांमध्ये गेले नाहीत. आता भाजपमध्ये येतो अशी हवा निर्माण झाली आहे. त्यांना सतत सत्तेत राहण्याचा सोस आहे. मात्र त्यांना आम्ही भाजपमध्ये घेणार नाही. तसेच त्यांचे पक्षात येणे भाजप कार्यकर्त्यांना बिलकूल रूचणार नाही.’ अशी टीका संभाजी पाटील निलंगेकरांनी अमित देशमुख यांच्या संभाव्य पक्षप्रवेशावर केली.

 

दरम्यान, नाशिक पदवीधर मतदार संघातून राजेंद्र विखे हे उत्सुक असून याबाबत भाजप सकारात्मक आहे. आणि आज दि.१२ दुपारपर्यंत तुम्हाला बातमी देऊ. असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

 

विधानपरिषद निवडणूकीबाबत शिंदे गट नाराज आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की,
यात शिंदे गटाने नाराज होण्याचा प्रश्नचं नाही. मी रोज एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बोलतो.
सगळ्यांसोबत बोलूनच उमेदवार जाहीर केले जात आहेत.
तसेच धुसफूस आमच्यात नाही तर महाविकास आघाडीमध्ये आहे.
एकीकडे नाना पटोले त्यांच्या लोकांना घेऊन नागपूरात बसले आहेत, ते भांडतायेत.
पण आमच्यात पूर्ण समन्वय आहे. असा दावा देखील यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Amit Deshmukh | vilasrao deshmukh son congress mla amit deshmukh rumors about joining bjp chandrashekhar bawankule reacts

 

हे देखील वाचा :

Gondia Crime News | गोंदिया हादरलं! सहलीमध्ये शिक्षकाने विद्यार्थिनीसोबत केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

Sanjay Shirsat | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीवर बोलले शिंदे गटातील हे आमदार; म्हणाले…

Pune Crime News | कोयता गँग विरोधात पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगाराकडून 9 कोयते जप्त

 

Related Posts