IMPIMP

Amit Raj Thackeray | शिवतीर्थावर नवीन पाहुण्याचं आगमन; राज ठाकरे झाले आजोबा

by nagesh
Amit Raj Thackeray | Arrival of a new guest on Shivatirtha ! raj thackeray became a grandfather his son amit thackeray and daughter in law mitali borude blessed with baby boy

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Amit Raj Thackeray | शिवतीर्थावर (Shivteerth) नवीन पाहुण्याचं आगमन झालं असून मनसे अध्यक्ष राज
ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Raj Thackeray) यांना पुत्र रत्नाचा लाभ झाला आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शर्मिला ठाकरे
(Sharmila Thackeray) हे आजोबा- आजी झाले आहेत. शिवतीर्थावर सध्या आनंदाचं वातावरण आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अमित ठाकरे आणि मिताली ठाकरे यांचा 27 जानेवारी 2019 रोजी विवाह सोहळा पार पडला होता. अमित ठाकरेंवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची जबाबदारीही देण्यात आली आहे. आता अमित ठाकरेंवर एक वडील म्हणून आणि राज ठाकरेंवर आजोबा म्हणून नवी जबाबदारी सांभाळावी लागणार आहे.

 

 

अमित ठाकरे आणि मिताली ठाकरे एका कॉलेजमध्ये होते. त्यांच्या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. राज यांची कन्या उर्वशी (Urvashi Thackeray) आणि मिताली यांची मैत्री असल्यामुळे मिताली यांचं कृष्णकुंजवर (Krishnakunj) येणं जाणं असायचं. काही दिवसानंतर अमित आणि मिताली यांनी आपल्या नात्याबद्दल घरी माहिती दिली. त्यानंतर दोघांच्या घरच्यांनी लग्नाला होकार कळवला.

 

 

दरम्यान, अमित ठाकरे यांच्यावर महापालिक निवडणुकांच्या (Municipal Elections) पार्श्वभूमीवर
नाशिकची (Nashik) जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी नाशिकमधील संघटन बांधणीवर लक्ष केंद्रीत केलं आहे.
त्याशिवाय ठाणे आणि कल्याण डोंबिवलीतही (Dombivli) त्यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला आहे.

 

 

Web Title : Amit Raj Thackeray | Arrival of a new guest on Shivatirtha ! raj thackeray became a grandfather his son amit thackeray and daughter in law mitali borude blessed with baby boy

 

हे देखील वाचा :

Pune MNS Office Bearers Resign | मनसेला फटका ! गुढीपाडवा मेळाव्यातील राज ठाकरे यांच्या भाषणानंतर पुण्यातील मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

ED Attached Sanjay Raut’s Property | शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीचा दणका, अलिबागमधील 8 प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई

Pune Crime | मॉडेरेटरने 27 वर्षीय लेक्चरर महिलेस कात्रज डेअरीमध्ये भरदुपारी लस्सी पिण्यासाठी नेलं, मारली मिठी

 

Related Posts