IMPIMP

Pune Crime | मॉडेरेटरने 27 वर्षीय लेक्चरर महिलेस कात्रज डेअरीमध्ये भरदुपारी लस्सी पिण्यासाठी नेलं, मारली मिठी

by nagesh
Pune Gang Rape | Gang-rape of woman with sedation spray; Sensational incident in Kondhwa area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | पेपर तपासणीचे काम पूर्ण झाल्यावर लस्सी पिण्याच्या बहाणाने महिलेला (Female Lecturer) कात्रज डेअरी (Katraj Dairy) येथे घेऊन जाऊन तेथे मिठी मारुन लज्जास्पद वर्तन करण्याचा प्रकार समोर आला आहे (Molestation Case) . याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police) मॉडेरेटर विकास पवार Moderator Vikas Pawar (रा. आंबेगाव खुर्द) याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याप्रकरणी कसबा पेठेत (Kasba Peth, Pune) राहणार्‍या एका २७ वर्षाच्या महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या लेक्चरर असून त्यांच्याकडे १२ वीचे पेपर तपासण्याचे काम दिले होते. (Pune Crime)

 

 

विकास पवार हा मॉडेरेटर म्हणून काम करीत होता. फिर्यादी यांना पेपर तपासण्याच्या कामात काही अडचण आल्यास त्या आरोपीला फोन करुन विचारत असत. सोमवारी १२ वीचे शेवटचे पेपर तपासून झाले. त्यानंतर विकास पवार याने या महिलेला लस्सी पिण्यासाठी दुपारी अडीच वाजता कात्रज डेअरी येथे नेले. तेथे त्याने हातात हात मिळवून त्यांच्या खांद्यावर हात टाकला. फिर्यादी यांनी त्यांचा हात झटकला असता त्याने फिर्यादीस मिठी मारुन मनास लज्जा उत्पन होईल, असे वर्तन केले. पोलीस उपनिरीक्षक थोरात तपास करीत आहेत.

 

Web Title: Pune Crime | Moderator takes 27-year-old lecturer woman to Katraj Dairy for a hearty lassi, hugs her

 

हे देखील वाचा :

Violation of Rera Act in Pune | पुण्यात RERA कायद्याचे उल्लंघन करुन दस्त नोंदणी ! 11 अधिकारी आणि कर्मचारी तडकाफडकी निलंबित; 33 जणांची चौकशी सुरू, कारणे दाखवा नोटीस

BMC Mayor Kishori Pednekar | महापौर किशोरी पेडणेकरांनी सांगितला धमाल किस्सा; म्हणाल्या – ‘हो तो कागद मी गिळला’

LIC Jeevan Shiromani Plan | 16 वर्षापर्यंत भरावा लागेल प्रीमियम, नंतर LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये मिळेल रू. 1 कोटी रिटर्न

 

Related Posts