IMPIMP

Amit Thackeray | अमित ठाकरे देखील ठेवणार आदित्य यांच्या पावलावर पाऊल, महाराष्ट्र दौर्‍यावर असताना दिले संकेत

by nagesh
Amit Thackeray | i will contest elections if the party orders says raj thackeray son and mns leader amit thackeray

औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाइन –  मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांचे पुत्र आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) हे पक्षात सध्या खुपच सक्रिय झाले असून ते सध्या राज्यव्यापी दौरा करत आहेत. त्यांनी औरंगाबाद येथे पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना महत्वाचे संकेत दिले. अमित (Amit Thackeray) म्हणाले, पक्षाला गरज वाटली तर भविष्यात मी निवडणूक लढवू शकतो.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

भविष्यात निवडणूक लढवण्याबाबत तुमचा काय विचार आहे, असा प्रश्न अमित (Amit Thackeray) यांना विचारला असता ते म्हणाले, पक्षाला जर गरज वाटली तर मी निवडणूकही (Election) लढवायला तयार आहे. शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Yuva Sena Chief Aditya Thackeray) हे प्रत्यक्ष निवडणूक लढवणारे ठाकरे कुटुंबातील पहिलेच व्यक्ती आहेत. आदित्य यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघातून (Worli Constituency) विजय मिळवला होता. त्यानंतर आता अमित ठाकरे यांनीही निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.

 

ठाकरे कुटुंबीय प्रत्यक्ष निवडणूक मैदानात उतरण्यापेक्षा ’रिमोट कंट्रोल’ हातात ठेवण्यासाठी ओळखले जातात.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shivsena Chief Balasaheb Thackeray) यांनी जाहीरपणे तसे स्पष्टच म्हटले देखील होते.
2014 च्या विधानसभा निवडणुकीआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा मुंबईतील सोमय्या मैदानातील
मनसेच्या मेळाव्यात भाषण करताना आपण स्वतः विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते.
मात्र नंतर राज यांनी माघार घेतली होती.

 

निवडणूक लढवण्याचा निर्णय मागे घेताना राज ठाकरे यांनी म्हटले होते की,
निवडणूक लढवण्याचा विचार मी केला होता. तशी घोषणाही मी केली होती. परंतु त्यानंतर बराच विचार केला.
आम्हा ठाकरे कुटुंबाचा ‘जेनेटिकल प्रॉब्लेम’ आहे. माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे
(Prabodhankar Thackeray), काका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही निवडणुका लढवल्या
नाहीत. एका मतदारसंघापुरते मर्यादित राहिलो नाही. संपूर्ण महाराष्ट्र हाच आमचा मतदारसंघ मानला होता.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Amit Thackeray | i will contest elections if the party orders says raj thackeray son and mns leader amit thackeray

 

हे देखील वाचा :

Chitra Wagh | कोणी जर मुली बाळींकडे वाकड्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न केला, तर…, चित्रा वाघ यांचा इशारा

Uddhav Thackeray | स्थानिक आमदार सोडा, उद्धव ठाकरे जरी निवडणुकीला उभे राहिले तरी उरणमध्ये त्यांना हरवेन, अपक्ष आमदार महेश बालदींचा दावा

Jayant Patil | जयंत पाटलांनी केली पदाधिकार्‍यांची कान उघडणी, कुणाकुणाची अब्रू घालवणार, चोपडा मतदारसंघ सोडून द्यायचाय का?

 

Related Posts