IMPIMP

Uddhav Thackeray | स्थानिक आमदार सोडा, उद्धव ठाकरे जरी निवडणुकीला उभे राहिले तरी उरणमध्ये त्यांना हरवेन, अपक्ष आमदार महेश बालदींचा दावा

by nagesh
Uddhav Thackeray | Leave local MLAs, even if Uddhav Thackeray contests elections, he will lose in Uran, claims Independent MLA Mahesh Baldi

पनवेल : सरकारसत्ता ऑनलाइन  उरण येथील अपक्ष आमदार महेश बालदी (Mahesh Baldi) यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे- Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाच्या अध्यक्षांना म्हणजे थेट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना निवडणुकीत हरवून दाखविण्याचा इशारा दिला आहे. महेश बालदी (Mahesh Baldi) हे भाजपच्या (BJP) व्यासपीठावरुन बोलत होते. यावेळी ते म्हणाले, स्थानिक आमदार सोडा, स्वत: उद्धव ठाकरे जरी निवडणुकीत उभे राहिले तरी उरणमध्ये त्यांना देखील मी हरवून दाखवेन.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राज्यात ज्याप्रकारे आता सत्तेतून पैसा आणि पैश्यातून सत्ता असा प्रकार सुरु आहे, तो कुठेतरी थांबला पाहिजे. जात, धर्म, भाषा आणि पंथाच्या नावावर सध्या राजकारण सुरु आहे. ज्यावेळी राजकारण्यांकडे बोलायला काही मुद्दे नसतात आणि ज्यावेळी त्यांचे कर्तृत्व संपते, अशा वेळी हे मुद्दे घेऊन राजकाण केले जात असल्याचे महेश बालदी म्हणाले.

 

माझ्या बाबतीत देखील हा मारवाडी आहे, अशी चर्चा झाली. माझी एकमेव इच्छा आहे की,
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमच्यासमोर महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aghadi) उमेदवार
उभा राहिला पाहिजे. आता माझ्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आहेत,
अमित शहा (Amit Shah) आहेत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आहेत.
त्यामुळे तुम्ही मला हरवू शकत नाही. तुम्ही मला हरवायला स्वत: जरी या भागातून उभे राहिलात,
तर मी तुम्हाला देखील हरवू शकतो, असे आव्हान बालदी यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिले.

 

 

Web Title :- Uddhav Thackeray | Leave local MLAs, even if Uddhav Thackeray contests elections, he will lose in Uran, claims Independent MLA Mahesh Baldi

 

हे देखील वाचा :

Jayant Patil | जयंत पाटलांनी केली पदाधिकार्‍यांची कान उघडणी, कुणाकुणाची अब्रू घालवणार, चोपडा मतदारसंघ सोडून द्यायचाय का?

Pune Crime | बांगलादेशातून बनावट नोटा आणून तस्करी करण्याचा प्रयत्न, खडकी बाजार परिसरातून तिघांना अटक

T20 World Cup | पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी टीम मॅनेजमेंट ‘या’ विकेटकीपरला देणार संधी

 

Related Posts