IMPIMP

Amol Mitkari | ‘छत्रपतींनी करून ठेवलेल्या ‘त्या’ गोष्टींमुळे पोर्तुगीजांना…”; इतिहासाचा दाखला देत मिटकरींचं भाजपवर टीकास्त्र

by nagesh
Amol Mitkari | NCP leader amol mitkari criticized bjp on roadshow of devendra fadnavis in nagpur today

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Amol Mitkari | पाच राज्यांपैकी भाजपला (BJP) चार राज्यांमध्ये यश मिळालं आहे. यामध्ये गोवा (Goa) राज्याचाही समावेश होता. गोव्यामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) विजयाचे शिल्पकार ठरले. फडणवीस आज विजयानंतर पहिल्यांदा नागपूरमध्ये (Nagpur) गेले होते. फडणवीसांची नागपूर विमानतळापासून ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या (Nitin Gadkari) घरापर्यंत रॅली (Rally) काढण्यात आली. याचाच धागा पकडत राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पोर्तुगीजांनी गोवा जिंकून महाराष्ट्रात (Maharashtra) आनंद साजरा करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा महाराष्ट्र जिंकायचा इरादा कधी सफल झाला नाही कारण इकडे जंजिरा (Janjira), सिंधुदुर्ग (Sindhudurg) असे अनेक जलदुर्ग आणि मजबूत आरमार “छत्रपती शिवाजी महाराजांनी” (Chhatrapati Shivaji Maharaj) निर्माण करुन ठेवले होते, असं अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं असून त्यामध्ये रोडशो असा हॅशटॅग वापरला आहे.

 

 

 

या रॅलीनंतर जनतेला संबोधित करताना देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर (Maha Vikas Aghadi Government) टीका केली. त्यासोबतच भाजप पक्ष हा येणाऱ्या कोणत्याही निवडणुकीत सगळीकडे भाजपचा झेंडा लागणार असल्याचं फडणवीस म्हणाले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, महाराष्ट्रामध्ये आता परिवर्तनाची लाट येत आहे. आम्ही या भ्रष्टाचारी सरकारचा (Corrupt Government) बुरखा फाडत आहोत.
सामान्यांच्या लक्षात येत आहे की हे सरकार महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) नाही तर महावसुली आघाडी आहे,
अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.

 

 

Web Title :- Amol Mitkari | NCP leader amol mitkari criticized bjp on roadshow of devendra fadnavis in nagpur today

 

हे देखील वाचा :

Mumbai-Pune Highway | लोणावळ्यातील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर ‘या’ वेळेत अवजड वाहनांना ‘नो-एन्ट्री’

Pune Crime | मुलीच्या प्रकरणातून तरुणाचा सपासप वार करुन खून, महिलेसह चारजणांना वारजे माळवाडी पोलिसांकडून अटक

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात 32 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts