IMPIMP

Budget 2022 | अर्थसंकल्पापूर्वी करदात्यांसाठी चांगली बातमी, जाणून घ्या तुम्ही कसा घेऊ शकता लाभ?

by nagesh
Old Income Tax Regime | old income tax regime with deductions must go said by revenue secretary tarun bajaj

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Budget 2022 | अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारीला 2022 चा अर्थसंकल्प (Budget 2022) सादर करणार आहेत. त्यांचा हा चौथा अर्थसंकल्प आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी (UP Assembly Election) सादर होणार्‍या या अर्थसंकल्पात सरकारकडून करदात्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र सरकारच्या अगोदर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) करदात्यांना आणखी एक दिलासा दिला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

ऑनलाइन होईल करसंबंधित प्रकरणांची सुनावणी
आता करसंबंधित बाबींचा निपटारा करण्यासाठी CBDT द्वारे e-advance ruling scheme लागू करण्यात आली आहे.

हा नियम लागू झाल्यानंतर प्राप्तीकर प्रकरणांशी संबंधित तक्रारींचा निपटारा ऑनलाइन होईल. सुनावणीदरम्यान करदात्यांना ऑनलाइन हजर राहता येणार आहे. त्याची अधिसूचनाही सरकारने जारी केली आहे.

 

 

या लोकांना होईल सर्वाधिक फायदा
या बदलाचा सर्वाधिक फायदा व्यापारी आणि अनिवासी भारतीयांना होणार आहे. कामकाजाच्या व्यस्ततेमुळे व्यावसायिकांना अनेकदा सुनावणीला उपस्थित राहता येत नाही. (Budget 2022)

त्याच वेळी, असे अनिवासी भारतीय, ज्यांचे कर दायित्व भारतात आहेत. ते लोक इच्छा असूनही सुनावणीला येऊ शकत नाहीत. नवीन नियमानंतर, तुम्ही आता ई-मेलद्वारे सीबीडीटीकडे अर्ज करू शकाल आणि सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केली जाईल.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

असा घेऊ शकता फायदा
नवीन योजनेनुसार, अर्जदार स्वत: किंवा प्रतिनिधीद्वारे ऑनलाइन कराशी संबंधित प्रकरणी त्यांना दिलेल्या नोटीस किंवा आदेशाचे उत्तर देऊ शकतात.
सीबीडीटीसमोर सुनावणीसाठी हजर राहण्याची गरज नाही. तुमचा मुद्दा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ठेवता येईल.
यापूर्वी, करदात्याला अ‍ॅडव्हान्स रुलिंगसाठी हजर राहावे लागत होते.

 

 

Web Title :- Budget 2022 | good news for taxpayers e advance ruling scheme implemented for taxpayers

 

हे देखील वाचा :

PPF | रोज 250 रुपये जमा केले तर मॅच्युरिटीवर मिळतील 62 लाख, जाणून घ्या संपूर्ण योजना

BMC Mayor Kishori Pednekar | ‘राणीच्या बागेतील हत्तीच्या पिल्लाचं नाव ‘चिवा’ अन् माकडाचं नाव ‘चंपा’ ठेवू’ – महापौर किशोरी पेडणेकरांचं प्रत्युत्तर

Urfi Javed | उर्फी जावेदने साडी उतरवून जाळीच्या ब्लाउजमध्ये अशी दिली बोल्ड पोज; सोशल मीडियावर उडाली खळबळ

 

Related Posts