IMPIMP

Anjali Damania On Jitendra Awhad | ‘जितेंद्र आव्हाडांनी विनयभंगाची कोणतीही कृती केलेली नाही’; अंजली दमानिया म्हणाल्या – ‘अत्यंत नीच दर्जाचं राजकारण’

by nagesh
Anjali Damania On Jitendra Awhad | anjali damania backs jitendra awhad after police filed molestation case over bjp women leader complaint mumbai news

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Anjali Damania On Jitendra Awhad | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांच्यावर भारतीय जनता पक्षाशी संबंधित (BJP) रीदा रशिद (Rida Rashid) नामक महिलेने मुंब्रा पोलीस ठाण्यात (Mumbra Police Station) विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना नुकताच ठाण्यातील ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) चित्रपटाचा प्रयोग बंद पाडल्याप्रकरणी अटक झाली होती. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका देखील करण्यात आली होती. त्यांच्यावर झालेल्या विनयभंगाच्या आरोपावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी त्यांची बाजू घेऊन भाष्य केले आहे. हा प्रकार अत्यंत नीच पातळीवरील राजकारण असल्याचे अंजली दमानिया म्हणाल्या आहेत. त्या मुंबईत प्रसार माध्यमांसोबत बोलत होत्या.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अंजली दमानिया यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा अयोग्य असल्याचे सांगितले. राज्यातील राजकारणात सध्या एकमेकांवर लाजिरवाणे आरोप होत आहेत. मला राष्ट्रवादी काँग्रेस आणि जितेंद्र आव्हाड यांच्याविषयी काहीही आस्था नाही. मी झालेल्या प्रकाराचा व्हिडिओ पाहिला आहे. त्यात आव्हाडांनी विनयभंगाची कोणतीही कृती केलेली नाही. त्यामुळे संबंधित महिलेने केलेले आरोप साफ चुकीचे आहेत. महाराष्ट्रात सध्या सुरु असलेले अत्यंत नीच आणि खालच्या दर्जाचे राजकारण थांबले पाहिजे, असे यावेळी दमानिया म्हणाल्या.

 

विनयभंगाच्या आरोपानंतर जितेंद्र आव्हाडांच्या राजीनाम्याची मागणी भाजपने केली आहे.
भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार (BJP Leader Ashish Shelar) यांनी आव्हाडांवर टीका केली आहे.
जितेंद्र आव्हाड निर्दोष असतील, तर त्यांनी कायदेशीरपणे आपली बाजू लढवावी.
डॉ. आबेंडकरानी (Dr. B. R. Ambedkar) निर्माण केलेल्या संविधानात प्रत्येकाला आपले निर्दोष्त्व सिद्ध
करण्याचा अधिकार आहे. पण जेव्हा निर्दोष्त्व सिद्ध करता येत नाही, तेव्हा असे प्रकार केले जातात.
त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा. आम्ही ती जागा लढवून जिंकू,
असे आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Anjali Damania On Jitendra Awhad | anjali damania backs jitendra awhad after police filed molestation case over bjp women leader complaint mumbai news

 

हे देखील वाचा :

Pune Crime | दुचाकीस्वार आणि पीएमपी चालकाची फ्रि स्टाईल हाणामारी; पुणे स्टेशन परिसरातील घटना, व्हिडिओ व्हायरल

7th Pay Commission | खुशखबर ! सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार; जाणून घ्या किती

Jitendra Awhad | बचावासाठी जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी ऋता मैदानात, म्हणाल्या – ‘… त्याला विनयभंग म्हणता येत नाही’

 

Related Posts