IMPIMP

Anti Corruption Bureau (ACB) Satara | बिअर शॉपीच्या परवान्यासाठी 3 लाखाच्या लाचेची मागणी, उत्पादन शुल्कचे तीन अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

by nagesh
Anti Corruption Bureau (ACB) Pune | Inspector of Police, Assistant Sub-Inspector and private persons involved in a bribery case of Rs 2 lakh in Pune; Both arrested while PI absconding, huge uproar

सातारा : सरकारसत्ता ऑनलाइनबियर शॉपीचा परवान्याचे (Beer Shop Licenses) प्रकरण वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच मागणाऱ्या (Demanding Bribe) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (State Excise Department) तीन अधिकाऱ्यांवर सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Satara) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Satara) सातारा शहर पोलीस ठाण्यात (Satara City Police Station) गुन्हा दाखल केल्यानंतर तिघांना अटक (Arrest) केली आहे. निरीक्षक सतीश विठ्ठलराव काळभोर Inspector Satish Vitthalrao Kalbhor (वय-56), दुय्यम निरीक्षक दत्तात्रय विठोबा माकर Deputy Inspector Dattatraya Vithoba Makar (वय-56), जवान नितीन नामदेव इंदलकर Jawan Nitin Namdev Indalkar (वय-36) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याबाबत 47 वर्षाच्या व्यक्तीने सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau (ACB) Satara) तक्रार केली आहे. तक्रारदार यांना नवीन बियर शॉपी सुरु करायची होती. यासाठी ते सातारा उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात गेले होते. त्यावेळी त्यांच्याकडे दत्तात्रय माकर आणि नितीन इंदलकर याने परवान्याचा प्रस्ताव (Proposal) वरिष्ठ कार्यालयात पाठवण्यासाठी तीन लाखाची लाच मागितली. तर निरीक्षक सतीश काळभोर यांनी तक्रारदाराला लाच रक्कम मागणीस प्रोत्साहन दिले. हा सर्व प्रकार 14 मार्च 2022 रोजी घडला होता.

 

दरम्यान सातारा एसीबीच्या (Satara ACB) अधिकाऱ्यांनी अनेक वेळा या अधिकाऱ्यांना पकडण्यासाठी सापळा रचला.
मात्र आरोपींना संशय आल्याने त्यांनी ठरलेली लाचेची रक्कम स्वीकारली नाही.
परंतु त्यांनी लाचेची मागणी केल्याचे एसीबीच्या तपासात निष्पन्न झाले.
त्यामुळे उत्पादन शुल्कच्या दोन अधिकारी आणि एका जवानावर गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना तातडीने अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के (Deputy Superintendent of Police Ashok Shirke) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 

Web Title :- Anti Corruption Bureau (ACB) Satara | bribery department arrests three excise officials for demanding rs 3 lakh for beer shop licenses in satara

 

हे देखील वाचा :

Pinched Nerve Remedies | शरीरातील नस दबल्याने गंभीर वेदना होत आहेत का? मिनिटात आराम देतील ‘हे’ 5 उपाय, आखडण्याची समस्या होईल दूर

Raisins Health Benefits | रात्री पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्यापोटी खा 5 मनूका, राहाल नेहमी तरुण; दूर पळून जाईल वृद्धत्व

कामाची बातमी ! तुमचे Aadhaar Card बनावट तर नाही ना? UIDAI ने सांगितली ओळखण्याची सोपी पद्धत

 

Related Posts