IMPIMP

कामाची बातमी ! तुमचे Aadhaar Card बनावट तर नाही ना? UIDAI ने सांगितली ओळखण्याची सोपी पद्धत

by nagesh
Aadhaar Card | is your aadhaar card fake or not uidai told easy way of identification

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आज आधार कार्ड (Aadhaar Card) हे एक असे ओळखपत्र बनले आहे, जे देशातील प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक कागदपत्र बनले आहे. 2009 मध्ये तत्कालीन केंद्र सरकारने देशभरात आधार कार्ड (Aadhaar Card) योजना सुरू केली. तेव्हापासून आधार कार्डचा वापर झपाट्याने वाढला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

या कामांसाठी आहे खूप महत्वाचे
यामध्ये सर्व नागरिकांची बायोमेट्रिक माहिती नोंदवली जाते. ट्रेनमध्ये प्रवास करण्यापासून ते मुलांच्या शाळेत प्रवेशापर्यंत, बँक खाते उघडण्यापासून शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापर्यंत सर्वत्र आधार कार्ड आवश्यक आहे. हे कार्ड नसेल तर सर्व कामे थांबतील. आधारच्या वाढत्या उपयुक्ततेसोबतच त्याच्याशी संबंधित फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत, आधार कार्ड जारी करणारी संस्था युआयडीएआय केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (MeitY) अंतर्गत काम करते. MeitY ने UIDAI च्या सहकार्याने बनावट आधार कार्ड तपासण्याचा एक सोपा मार्ग सांगितला आहे. (Aadhaar Card)

 

युआयडीएआयने दिला इशारा
युआयडीएआयने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक ट्विट शेअर करून इशारा दिला आहे. युआयडीएआयने म्हटले आहे की प्रत्येक 12 अंकी अंक हा आधार कार्ड क्रमांक नाही. अशा परिस्थितीत अशा बनावट आधार क्रमांकांपासून नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.

 

यासोबतच क्रॉस चेकिंगशिवाय तुम्ही आधार कार्ड स्वीकारू नका. जर तुम्हाला खरे आणि बनावट आधार कार्ड ओळखायचे असेल, तर तुम्ही काही सोप्या स्टेप्स फॉलो करून ते शोधू शकता. चला तर मग जाणून घेऊया –

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

1. युआयडीएआयची अधिकृत वेबसाइट uidai.gov.in वर क्लिक करा

2. पुढे My Aadhaar पर्यायावर क्लिक करा

3. यानंतर आधारशी संबंधित अनेक सेवा तुमच्यासमोर खुल्या होतील.

4. येथे Verify an Aadhaar number वर क्लिक करा

5. येथे 12 अंकी आधार क्रमांक टाका

6. त्यानंतर कॅप्चा प्रविष्ट करा

7. जर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा असेल तर तुम्हाला पुढील पेजवर रिडायरेक्ट केले जाईल

8. यानंतर तुमचा आधार क्रमांक, वय, लिंग आणि राज्य इत्यादी माहिती नोंद असेल तर आधार कार्ड खरे आहे अन्यथा ते बनावट आहे.

 

Web Title :- Aadhaar Card | is your aadhaar card fake or not uidai told easy way of identification

 

हे देखील वाचा :

आता खाव्या लागणार नाहीत गोळ्या, अमेरिकन डॉक्टरने सांगितला Blood Pressure कंट्रोल करण्याचा सर्वात स्वस्त-सोपा उपाय

Pravin Tarde’s Historical Film Sarsenapati Hambirrao | स्नेहल तरडे साकारणार ‘सौ. लक्ष्मीबाई हंबीरराव मोहिते’ ! खऱ्या आयुष्यातील जोडीदार आता मोठ्या पडद्यावरही देणार साथ

Chhagan Bhujbal on Navneet Rana | ‘मलिकांनी 5 लाख घेतले म्हणून कारवाई केली म्हणतात, नवनीत राणांनी तर 80 लाख घेतले आता….’; भुजबळांनी केली ‘ही’ मोठी मागणी!

 

Related Posts