IMPIMP

Anti Corruption Bureau Kolhapur | 4 हजाराची लाच घेताना पोलीस कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

by nagesh
Anti Corruption Bureau (ACB) Pune | Inspector of Police, Assistant Sub-Inspector and private persons involved in a bribery case of Rs 2 lakh in Pune; Both arrested while PI absconding, huge uproar

इचलकरंजी :  सरकारसत्ता ऑनलाइनदाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना (Accepting Bribe) शहापूर पोलीस ठाण्यातील (Shahapur Police Station) एका पोलीस नाईकास कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Kolhapur) रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (गुरुवार) सकाळी अकराच्या सुमारास कोरोची येथे करण्यात आली आहे. कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau Kolhapur) केलेल्या या कारवाईमुळे शहापूर पोलीस ठाण्यात खळबळ उडाली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पोलीस नाईक पांडुरंग लक्ष्मण गुरव Police Naik Pandurang Laxman Gurav (रा. हळदकर बंगला, खानापूर ता. भुदरगड जि. कोल्हापूर, मुळ रा. पिरळ ता. राधानगरी) असे लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या पोलिसाचे नाव आहे. संगमनगर तारदाळ (Sangamnagar Tardal) येथे दीड महिन्यापूर्वी 324 चा गुन्हा (FIR) घडला होता. त्यानुसार तक्रारदार यांच्या आईविरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यांमध्ये मदत करण्यासाठी पांडुरंग गुरव यांनी तक्रारदार यांच्याकडे 4 हजार रुपयांची लाच मागितली होती.

 

तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Anti Corruption Bureau Kolhapur) तक्रार केली. यानंतर पोलीस नाईक पांडुरंग गुरव यांनी गुरुवारी सकाळी पैसे देण्यासाठी कोरोची येथे बोलवून घेतले. त्यानुसार पथकाने या ठिकाणी सापळा रचून 4 हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ही कारवाई पोलीस निरीक्षक सतीश मोरे (Police Inspector Satish More),
सहायक पोलीस निरीक्षक संजीव बंबरगेकर (API Sanjeev Bumbargekar),
पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय चव्हाण, पोलीस नाईक विकास माने, सुनिल घोसाळकर, नवनाथ कदम, मयूर देसाई यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Anti Corruption Bureau Kolhapur | while accepting a bribe of rs 4000 a police constable from shahapur police station was caught red handed by Anti Corruption Bureau Kolhapur

 

हे देखील वाचा :

MLA Nitesh Rane | भाजपला दणका ! नितेश राणेंचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

Rashifal 2022 | नवीन वर्ष 2022 मध्ये पहिल्या दिवसापासून कोणत्या 3 राशींवर राहिल शनीचा चांगला ‘प्रभाव’; जाणून घ्या

Pune Corona | चिंताजनक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात नवीन कोरोना रूग्णांची संख्या 300 च्या टप्प्यात, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts