IMPIMP

Areez Khambatta Passes Away | संपूर्ण भारताला ‘रसना’ची सवय लावणारे अरीज खंबाटा काळाच्या पडद्या आड

by nagesh
Areez Khambatta Passes Away | rasna founder areez pirojshaw khambatta passes away at 85

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – Areez Khambatta Passes Away | ‘रसना’ (Rasna) शीतपेयाने (Colddrink) मागील अनेक दशके भारतीयांचा उन्हाळा सुसह्य केला आहे. तसेच घरगुती कार्यक्रमात पाहुण्यांची तहान भागवली. भारतासह इतर देशांमधील बाजारपेठेत आजही रसनाला मागणी आहे. पण, रसना कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष अरीज पिरोजशॉ खंबाटा (Areez Pirojshaw Khambatta) यांचे शनिवारी निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. (Areez Khambatta Passes Away)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

खंबाटा (Areez Khambatta) यांनी 1970 दशकात रसना या उत्पादनाची सुरुवात केली आणि थोड्याच काळात या शीतपेयाची मागणी वाढली. स्वस्त आणि मस्त म्हणून रसनाकडे (Rasna) पाहिले जाऊ लागले. भारतीयांचा उन्हाळा तर रसना शिवाय असह्य आहे. पण, हा ब्रँड भारत पुरता मर्यादित न राहता आता ६० देशांमध्ये विकला जातो. हा भारतीय ब्रँड आता जगातील बहुराष्ट्रीय कंपन्यांना आव्हान देतो. अशा या शीतपेयाची सुरुवात खंबाटा
यांनी केली होती.

 

खंबाटा यांनी भारतीय उद्योग, व्यवसाय आणि समाजसेवेच्या माध्यमातून सामाजिक विकासात महत्त्वाचे
योगदान दिले. अरीज खंबाटा हे अहमदाबाद पारशी पंचायतीचे माजी अध्यक्ष होते. त्याशिवाय पारशी-इराणी
झोराष्ट्रीयन समुदायाची संघटना असलेल्या WAPIZ या संघटनेचेही अध्यक्ष होते, अशी माहिती रसना ग्रुपने दिली.

 

 

Web Title :- Areez Khambatta Passes Away | rasna founder areez pirojshaw khambatta passes away at 85

 

हे देखील वाचा :

Aurangabad Crime | औरंगाबादमध्ये विचित्र घटना, स्वतःला पेटवून घेऊन प्रियकराने मारली प्रेयसीला मिठी

Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील निम्म्या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

Govinda Naam Mera | अखेर ‘गोविंदा नाम मेरा’चा ट्रेलर प्रदर्शित; ट्रेलरमध्ये सयाजी शिंदे यांची झलक

 

Related Posts