IMPIMP

Kirit Somaiya | ‘त्यांनी खुर्चीसाठी आयुष्य आणि धर्मही विकला, ते मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा कसला देतायत’ – किरीट सोमय्या

by nagesh
Kirit Somaiya | kirit somaiyas serious allegations against uddhav thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Kirit Somaiya | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Sridhar Patankar) यांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालयाने (ED) कारवाई केल्याने राज्यात वादंग निर्माण झाला. यानंतर भाजपच्या (BJP) नेत्यांकडून नैतिकतेच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या राजीनाम्याची मागणी केली जातेय. या विषयावरुन भाजपचे जेष्ठ नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना विचारण्यात आले असता सोमय्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आज (बुधवारी) मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चांगलेच फटकारले आहे. ”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खुर्चीसाठी आयुष्य आणि धर्मही विकला. त्यामुळे ते कितीही आरोप झाले तरी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाहीत,” अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे.

 

पुढे बोलताना सोमय्या म्हणाले, ”उद्धव ठाकरे यांनी त्यासाठीच नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतला नाही. भविष्यात आपले घोटाळेही बाहेर येतील आणि आपल्या राजीनाम्याची मागणी होईल, याची जाणीव उद्धव ठाकरे यांना होती. त्यामुळेच देशद्रोह्यांना टेरर फंडिंग करणाऱ्या मलिक यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. पण महाराष्ट्राची जनता हे चालून देणार नाही. आमची लढाई ही सरकार पाडण्यासाठी किंवा कोणाचा राजीनामा घेण्यासाठी नाही. तर भाजपची लढाई ही महाराष्ट्राला घोटाळेबाजांपासून मुक्त करण्यासाठी आहे.”

 

दरम्यान, ”उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक (Anvay Naik) यांच्यात जमिनीचा व्यवहार आहे, हे मी आधीपासून सांगत होतो.
मात्र, तेव्हा माफीया सेनेचे लोक माझ्यावर हल्ला करत होते.
हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदीसोबत (Nandkishor Chaturvedi) उद्धव ठाकरेंचे संबंध काय आहेत, हे त्यांनीच सांगावं.
म्हणजे ईडीला आणि इतर तपास यंत्रणांना जास्त मेहनत करावी लागणार नाही.” असं सोमय्या म्हणाले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

”उद्धव ठाकरेंनी 19 बंगले लपवण्याचा खूप प्रयत्न केला. ठाकरे कुटुंबाने उभी केलेली एक कंपनी नंदकिशोर चतुर्वेदींना कशी गेली?
गेल्या 2 वर्षांपासून पोलिसांचा माफियांप्रमाणे वापर करून पैसे जमा करण्यात येत आहेत.
येत्या काही दिवसांत शिवसेनेच्या सहा नेत्यांचे घोटाळे मी लवकरच बाहेर काढणार असल्याचा इशारा देखील सोमय्या यांनी दिला आहे.

 

Web Title :- Kirit Somaiya | bjp leader kirit somaiya takes a dig at cm uddhav thackeray after ed action against shridhar patankar

 

हे देखील वाचा :

Rupali Chakankar | रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा (व्हिडीओ)

Sara Sachin Tendulkar | सारा तेंडुलकर करतेय लंडनमध्ये धमाल, सुंदर फोटो शेअर करून चाहत्यांना लावलं वेड

Pune Crime | सामाईक जागेच्या वादातून तिघांना कुऱ्हाडीने मारहाण, लोणी काळभोर परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या एकाला अटक

 

Related Posts