IMPIMP

Rupali Chakankar | रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा (व्हिडीओ)

by nagesh
Maharashtra State Women Commission Public hearing from 19th to 21st July under Mhila Aayog Aypa Dari initiative in Pune district

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनरुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा (NCP Women’s State President) राजीनामा (Resignation) दिला आहे. रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) सध्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा (State Women’s Commission) आहेत. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपद सोडले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीआधी (Assembly Elections) चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला. यानंतर रिकामे झालेले महिला प्रदेशाध्यक्षपदाची माळ रुपाली चाकणकर यांच्या गळ्यात पडली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता महिला प्रदेशाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाची सुत्र हाती घेताच अनेक मोठी प्रकरणं हाताळली आहेत. त्यामुळे त्यांचे ते काम पाहता त्यांना त्याच पदावर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

 

मुंबईत राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत रुपाली चाकणकर यांनी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याकडे सुपूर्द केला. चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर महिलांनी चाकणकर यांच्यावर राजीनामा मागे घेण्याचा आग्रह धरला. तसेच महिलांनी जयंत पाटील यांच्याकडे रुपाली चाकणकर यांचा राजीनामा स्विकारु नये अशी मागणी केली. यावेळी रुपाली चाकणकर यांनी महिलांना सांगितले की, मी जरी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत असले तरी मी तुमच्यासोबत सदैव राहील असे सांगितले.

 

 

Web Title :- Rupali Chakankar | rupali chakankar resign as ncp maharashtra woman president post

 

हे देखील वाचा :

Sara Sachin Tendulkar | सारा तेंडुलकर करतेय लंडनमध्ये धमाल, सुंदर फोटो शेअर करून चाहत्यांना लावलं वेड

Sanjay Raut | पाटणकरांवरच्या कारवाईनंतर मुख्यमंत्र्यांंसोबत काय बोलणं झालं?, संजय राऊत म्हणाले….

Pune Crime | सामाईक जागेच्या वादातून तिघांना कुऱ्हाडीने मारहाण, लोणी काळभोर परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या एकाला अटक

Ashish Shelar | गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडून शेलारांची मागणी मान्य, सभागृहात केली मोठी घोषणा (व्हिडीओ)

 

Related Posts