IMPIMP

Ashish Shelar | ‘ज्यांना मुंबईतील रस्त्यावरील बुजवता येत नाही खड्डे, त्यांना विद्यापीठांचे कशाला करायचे होते राजकीय अड्डे!’, आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला

by nagesh
Ashish Shelar | bjp also do protest againt mahavikas aghadi tomorrow in mumbai says ashish shelar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  – भाजप आमदार (BJP MLA) आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी पुन्हा एकदा शिवसेना (Shivsena) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ज्यांना मुंबईतील बुजवता येत नाही खड्डे, त्यांना विद्यापीठांचे कशाला करायचे होते राजकीय अड्डे, असे म्हणत आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी टीका केली आहे. तसेच शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) हे विधेयक मागे घेऊन विद्यापीठांचे संभाव्य राजकीयकरण थांबवले, असेही त्यांनी म्हटलं. शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात ट्विट केले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पेंग्विन सेनेला चपराक! सरकारचे आभार! असं म्हणत आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आदित्य ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. शेलार यांनी, विद्यापीठांचे कुलपती (Chancellors of Universities) म्हणून राज्यपालांना (Governor) असलेले अधिकार काढून ते शिक्षण मंत्र्यांना देण्याच्या राजकीय निर्णयाला समाजातील प्रत्येक स्तरातून प्रचंड विरोध असतानाही ठाकरे सरकारने (Thackeray Government) अट्टाहासाने ते विधेयक मंजूर केले होते. आम्ही त्याला सभागृहात आणि बाहेरही कडाडून विरोध केला होता, असे शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

दुसऱ्या ट्विटमध्ये आशिष शेलार यांनी म्हटले की, शिंदे-फडणवीस सरकारने हे विधेयक मागे घेऊन विद्यापीठांचे संभाव्य राजकीयकरण थांबवले ! विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान रोखले. पेंग्विन (Penguin) सेनेला चपराक! सरकारचे आभार! ज्यांना मुंबईतील रस्त्यावरील बुजवता येत नाही खड्डे त्यांना विद्यापीठांचे कशाला करायचे होते राजकीय अड्डे! असं देखील त्यांनी म्हटले. यापूर्वी देखील वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावरुन (Vedanta Foxconn project) त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला होता.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मग घ्या ना धौती योग!

ज्यांनी राम वर्गणीची खिल्ली उडवली.. ज्यांनी अडीच वर्षे मंदिरात देवाला बंदिवान केले,
ज्यांनी दहिहंडी (Dahihandi), गणेशोत्सव (Ganeshotsav), नवरात्र उत्सव (Navratri Festival)
बंद करायला लावले त्यांना आता शिंदे-फडणवीस आल्यानंतर मुंबईत उत्सवाची धूम सुरु आहे हे पाहून पोटात
मळमळ होतोय, मुरड मारतेय म्हणून ते सामनातून जळजळ व्यक्त करत आहेत.
ज्यांना मराठी माणसाचे उत्सव आणि आनंद बघून मळमळ, जळजळ होतेय, त्यांना आमचा एकच सल्ला
‘मग घ्या ना धौती योग!’, अशा शब्दांत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

 

Web Title :- Ashish Shelar | bjp ashish shelar slams shivsena aaditya thackeray and uddhav thackeray

 

हे देखील वाचा :

BJP On Shivsena | मराठी माणसाचा उत्सव पाहून मळमळतंय…मग घ्या ना धौती योग; शिवसेनेवर भाजपाची टीका

Sindhutai Sapkal | दिवंगत पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेच्या नावाने नागरिकांची ऑनलाईन फसवणूक, राज्यभरात नागरिकांची फसवणूक झाल्याचा संशय

Uddhav Thackeray | आमदार संतोष बांगर यांच्या समर्थकाची शिवसेनेच्या महिला पदाधिकार्‍याला शिवीगाळ, थेट उद्धव ठाकरेंनी घेतली दखल, म्हणाले – एक काम कर…

 

Related Posts