IMPIMP

BJP On Shivsena | मराठी माणसाचा उत्सव पाहून मळमळतंय…मग घ्या ना धौती योग; शिवसेनेवर भाजपाची टीका

by nagesh
BJP On Shivsena | mumbai bjp president ashish shelar criticism of shivsena uddhav thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – BJP On Shivsena | शिंदे गट (Shinde Group) – भाजपा विरूद्ध शिवसेना असा सामना सातत्याने रंगत आहेत. राज्यात हे तिन पक्ष एकमेकांवर निरर्थक आरोप-प्रत्यारोप करत लोकांचे राजकीय मनोरंजन करत आहेत. परंतु, या राजकीय गोंधळात सर्वच पक्षांच्या नेत्यांच्या काही वक्तव्यांमुळे राजकारणाचा दर्जा मात्र घसरत चालला असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. आता शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून टीका केल्यानंतर मुंबई भाजपा अध्यक्ष अशिष शेलारांनी (Ashish Shelar) उत्तर देताना मराठी माणसाचा उत्सव पाहून शिवसेनेला मळमळ होत असेल तर…मग घ्या ना धौती योग, अशी टीका (BJP On Shivsena) केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, शिवसेनेच्या शाखा म्हणजे 24 तास लोकांसाठी उघडी असलेली जनमंदिरेच आहेत. तितकीच ती न्यायाची मंदिरे आहेत. शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेची केलेली ही रचना आजही मजबूत पायावर उभी आहे. ती कमळाबाईच्या मराठी दांडियाने इंचभरही हलणार नाही. (BJP On Shivsena)

 

या टीकेला मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले आहे की, ज्यांनी राम वर्गणीची खिल्ली उडवली. कोरोनात अडीच वर्षे मंदिरात देवाला बंदिवान केले. ज्यांनी गणेशोत्सव (Ganeshotsav), नवरात्रौत्सव (Navratri Festival) बंद करायला लावले त्यांना आता शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) आल्यानंतर मुंबईत उत्सावाची धूम सुरू आहे हे पाहून पोटात मळमळ होतेय. मुरड मारतेय म्हणून ते सामनातून जळजळ व्यक्त करत आहेत. ज्यांना मराठी माणसाचे उत्सव आणि आनंद बघून मळमळ, जळजळ होतेय त्यांना आमचा एकच सल्ला मग घ्या ना धौती योग (Dhoti Yoga).

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शेलार यांनी पुढे म्हटले आहे की, भाजपा दरवर्षीच सगळे उत्सव साजरा करते. महाराष्ट्रातील माणसाच्या सुख-दुखात सहभागी होते. त्याचे कधीच राजकारण केले नाही. कोरोना, वादळ, अतिवृष्टी या संकटात भाजपा नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते घरात बसून राहिले नाहीत. घरोघरी जाऊन मदत करत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (Rashtriya Swayamsevak Sangh) संस्कार आमच्यावर आहेत. त्यामुळे आम्ही कधीच जे केले त्याचे करून दाखवले होर्डिंग लावले नाहीत.

 

शेलार यांनी म्हटले आहे की, थापा मारणार्‍यांकडे आता ’थापा’ पण राहिला नाही आणि उत्सवही नाही.
यावेळी आम्ही उत्सवाची केवळ मुंबईतील आकडेवारी देऊन गर्वहरण केले. त्यावेळी मात्र जळजळ व्हायला लागली.
लालबाग, परळ, शिवडीत मराठी दांडिया (Dandiya) भाजपाने आयोजित केला त्याचा सामनाकारांना आणि पेग्विंन
सेनेला एवढा त्रास का झाला? याकूबच्या कबरीचे सुशोभीकरण करणार्‍यांना मराठी दांडियाचा त्रास होणारच.

 

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करताना आशिष शेलार यांनी म्हटले आहे की, अहंकार,
गर्वहरण करणार्‍या दुर्गेचा, शारदेचा अंबेचा हा उत्सव आहे. या उत्सवात ज्यांना राजकीय जळजळ होतेय.
राजकीय वाद काढून क्लेश करून तुझ्या भक्तांच्या आनंदात विरजण घालत आहेत त्यांच्यासाठी अंबे माते
तुझ्या चरणी एकच प्रार्थना, प्रसन्नवदने प्रसन्ने होशी निजदासा, क्लेशापासून सोडवी, तोडी भवपाशा.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- BJP On Shivsena | mumbai bjp president ashish shelar criticism of shivsena uddhav thackeray

 

हे देखील वाचा :

Sindhutai Sapkal | दिवंगत पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेच्या नावाने नागरिकांची ऑनलाईन फसवणूक, राज्यभरात नागरिकांची फसवणूक झाल्याचा संशय

Uddhav Thackeray | आमदार संतोष बांगर यांच्या समर्थकाची शिवसेनेच्या महिला पदाधिकार्‍याला शिवीगाळ, थेट उद्धव ठाकरेंनी घेतली दखल, म्हणाले – एक काम कर…

Eknath Khadse | …तर मोदीही मला संपवू शकत नाहीत, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘…तर हे वक्तव्य दुर्दैवी’

 

Related Posts