IMPIMP

Ashish Shelar | शिवसेनेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाचे नाव बदलून ‘रडकी सेना’ ठेवायला पाहिजे

by nagesh
BJP MLA Ashish Shelar | ashish shelar criticized mahavikas aghadi including shivsena after mumbai blast threatening call

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे -Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) यांनी पक्षाचे नाव बदलून आता ‘रडकी सेना’ ठेवायला पाहिजे, असा सल्ला भाजपचे मुंबई अध्यक्ष (BJP Mumbai President) आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिला आहे. सत्तेत असताना ते केंद्र सरकारच्या (Central Government) नावाने रडत होते. आता विरोधी पक्षात असताना कधी न्यायालयाचे नावाने, तर कधी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (Central Election Commission) नावाने रडतात. उद्या अंधेरी पोटनिवडणुकीत पराभव झाला, तर अंधेरीतील जनतेच्या नावाने रडारड सुरु करतील, असे देखील आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी (Andheri By Election) मुरजी पटेल (Murji Patil) हे गेले असता,
त्यांच्यासोबत लोकांचा महापूर आला होता. आमच्यासमोर 10 पक्षांना सोबत घेऊन 10 तोंडांचा रावण उभा आहे.
ते बाहेरचे लोक बोलवत आहेत.
अनिल परब (Anil Parab) हे उपरे बाहेरचे लोक आणि त्यांच्याविरोधात स्थानिक मुरजी पटेल (Murji Patel)
असा हा सामना होणार आहे. त्यामुळे या लढतीत भाजप, बाळासाहेबांची शिवसेना आणि रिपाई गटाच्या उमेदवाराचा 25 – 30 हजार मताधिक्यांनी विजय होणार असल्याचा विश्वास आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दर्शविला.

 

अंधेरीत मुरजी पटेल यांना काका म्हणून ओळखतात. प्रत्येक नागरिक त्यांना ओळखतो.
ही लढाई राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) विरोधात बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shivsena)अशी आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून सहानुभूतीच्या जोरावर ही निवडणूक लढविली जात आहे.
ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा राजीनामा उशीरा देऊन त्यांना उमेदवारी न देण्याचा ठाकरे गटाचा डाव होता,
असा आरोप दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केला आहे.

 

दरम्यान, अंधेरीतील निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
ही लढत केवळ लटके आणि पटेल यांच्यातील नसून महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) विरुद्ध शिंदे गट आणि भाजपची झाली आहे. दोनही गटांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Ashish Shelar | shivsena uddhav balasaheb thackeray should change the name of the party to radki sena bjp ashish shelar

 

हे देखील वाचा :

T20 World Cup 2022 | आमच्याकडे सुद्धा धोनी आहे… पाकिस्तानच्या ‘या’ माजी खेळाडूचे मोठे विधान

Uday Samant | उदय सामंत यांचा थेट इशारा, म्हणाले – ‘ज्यावेळी भाजप आमचा वापर करतंय असं वाटेल, तेव्हा आम्ही…’

Eknath Khadse | एकनाथ खडसे पोलीस ठाण्यासमोरच झोपले, 18 तासांचे ठिय्या आंदोलन, दूध संघ गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी

 

Related Posts