IMPIMP

Eknath Khadse | एकनाथ खडसे पोलीस ठाण्यासमोरच झोपले, 18 तासांचे ठिय्या आंदोलन, दूध संघ गैरव्यवहारप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी

by nagesh
Eknath Khadse | eknath khadse statement on ed cbi cid acb raid on opposition leaders treat like enemy

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाइन जिल्हा दूध संघात झालेल्या (Jalgaon Jilha Sahakari Dudh Sangh) दीड कोटी रूपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी संबंधितांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पोलीस ठाण्यासमोर तब्बल 18 तास ठिय्या आंदोलन केले. पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याने अखेर रात्री खडसे (Eknath Khadse) हे पोलीस ठाण्यासमोरच झोपले होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दरम्यान, सकाळी राष्ट्रावादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या उपस्थितीत जिल्हा पोलीस अधीक्षकांसोबत झालेल्या बैठकीनंतर एकनाथ खडसे यांनी आंदोलन स्थगित केले असून न्यायालयात धाव घेणार असल्याचे सांगितले. एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी आरोप केला आहे की, जिल्हा दूध संघात झालेला गैरव्यवहार हा गैरव्यवहार नसून तब्बल दीड कोटी रुपयांची चोरी आहे. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची त्यांनी मागणी केली.

 

आज सकाळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खडसेंची भेट घेतली.
यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांसोबत (District Superintendent of Police) खडसे यांनी चर्चा केली.
बंद दाराआड झालेल्या चर्चेनंतर खडसेंनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.
दूध संघातील कोट्यवधी रूपयांच्या चोरी प्रकरणी गुन्हा दाखल झाला नसल्याने न्यायालयात दाद मागणार आहोत,
न्यायालयाकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल, असे खडसे म्हणाले.

 

दरम्यान, खडसे यांनी काल शहर पोलीस स्थानकाच्या बाहेरच ठिय्या आंदोलन सुरू केल्यानंतर रात्री 12 च्या सुमारास पोलिसांनी त्यांचे निवेदन स्वीकारले.
मात्र गुन्हा दाखल न केल्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षकांच्या दालनातच पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सकाळी पोलीस अधिक्षकांनी येऊन खडसेंची भेट घेतली.
त्यानंतर एसपी, जयंत पाटील आणि खडसे यांच्यात चर्चा झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Eknath Khadse | after 18 hours ncp leader eknath khadse withdrew the protest

 

हे देखील वाचा :

Nitesh Rane | आज जर का रमेश लटके हयात असते, तर ते…, नितेश राणेंचा ठाकरेंवर आरोप

Jayant Patil | पोलीस दबावाखाली गुन्हा दाखल करुन घेत नाहीत, जयंत पाटील यांचा आरोप

Sourav Ganguly ने बीसीसीआय अध्यक्षपद सोडल्यानंतर विराटच्या चाहत्यांनी व्यक्त केला आनंद

Sara Ali Khan – Shubman Gill | शुबमन गिल व सारा अली खानचा हॉटेलमधील ‘तो’ क्षण मोठ्या प्रमाणात व्हायरल

 

Related Posts