IMPIMP

Aurangabad Crime | औरंगाबादमधील धक्कादायक प्रकार! घरामध्ये आढळला मृतदेह, घातपात की नरबळी?

by nagesh
Aurangabad Crime | human sacrifice human sacrifice in the city of aurangabad

औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाईन  – Aurangabad Crime | वाळूजमधील समता कॉलनीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भाडोत्री फोन उचलत नसल्याने आणि बऱ्याच महिन्यांचे भाडे थकले असल्याने घरमालक आपल्या खोलीवर गेला. यावेळी त्याला किचनच्या ओट्याखाली कपडे आणि मिठात गुंडाळलेला मृतदेह आढळून आला. हा मृतदेह ओट्याखाली रेती आणि सिमेंटमध्ये पुरला होता. त्यावर शेंदूर लावलेले दोन दगड ठेवले होते. तसेच लिंबू देखील वाहिले होते. त्यामुळे मालकाने या प्रकाराची वर्दी पोलिसांना दिली आणि हा प्रकार उघडकीस आला आहे. हा नरबळीचा प्रकार असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळूज येथे कामगार वस्ती म्हणून प्रसिद्ध असलेल्या जागेची समता कॉलेनी म्हणून ओळख आहे. या ठिकाणी सूर्यकांत गोरखनाथ शेळके (वय 57, रा. वाघुली, शेवगाव, जि. नगर) यांच्या खोल्या आहेत. त्यांनी सध्या तेथे भाडेकरू ठेवले आहेत. पण 20 मे 2022 पासून त्यांच्या एका खोलीतील भाडेकरू काकासाहेब नामदेव भुईगड (रा. धानोरा, फुलंब्री) हा त्याच्या पत्नी आणि दोन मुलींसह राहत होता. नवरात्रीनिमित्त मूळगावी जाऊन येतो म्हणून जे ते लोक गेले ते अद्याप परतले नव्हते. त्यांच्याकडे एक महिन्याचे भाडे थकले होते. त्यामुळे घरमालक त्याला अधूनमधून फोन करत होता. त्याने भाडे दिले नाही आणि नंतर फोन देखील घेणे बंद केले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

त्यामुळे शेळके खोलीवर गेले. त्यानंतर भाडोत्री आधीच खोली सोडून पसार झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
खोलीत फिरताना शेळके यांना धक्का बसला. त्यांना किचनचा अर्धा भाग रेती आणि सिमेंटने बंद केलेला दिसला.
त्यावर दोन शेंदूर लावलेले दगड ठेवले होते. त्यांनी सिमेंट आणि रेती बाजूला करून तिथे काय ठेवले आहे,
याचा शोध घेतला. त्यावेळी त्यांना तेथे कपड्यात गुंडाळलेला मृतदेह आढळून आला.
त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

 

 

Web Title :- Aurangabad Crime | human sacrifice human sacrifice in the city of aurangabad

 

हे देखील वाचा :

Skin Care | तुम्हाला Shraddha Kapoor सारखी ग्लोइंग स्किन हवी आहे का?, रात्री हे जेल चेहऱ्यावर लावून झोपा

Bollywood Actresses | बॉलिवूडच्या ‘या’ टॉप अभिनेत्री एका चित्रपटासाठी घेतात एवढे पैसे

Food Which Makes Muscles Strong | मांसपेशींसाठी पॉवरबँक आहेत हे ५ फूड्स, शरीराला मिळते जबरदस्त एनर्जी

 

Related Posts