IMPIMP

Ayushman Card-Omicron | ओमिक्रॉनचा कहर झपाट्याने वाढला ! संक्रमित झाल्यास आयुष्मान कार्डद्वारे मोफत उपचार होणार का? जाणून घ्या याच्याशी संबंधी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

by nagesh
Ayushman Card Omicron | omicron havoc increased rapidly treatment be free from ayushman card if infected

नवी दिल्ली : वृत्त संस्थाAyushman Card-Omicron | देशवासीयांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने आयुष्मान भारत मिशन सुरू केले होते. ज्यामध्ये शासनाकडून पात्र लोकांना गोल्डन कार्ड दिले जाते. यामध्ये कार्डधारकाला कमाल 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळू शकतात. त्याचबरोबर या कार्डचा थेट लाभ कामगार, गरीब व सामान्य कुटुंबातील व्यक्ती घेतात आणि अनेक गंभीर आजारांवर उपचार घेतात (Ayushman Card-Omicron).

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

अलीकडे, देशात कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट वेगाने पसरत आहे. अशा स्थितीत तुमच्या मनात प्रश्न येऊ शकतो की, या कार्डच्या मदतीने ओमिक्रॉनवर मोफत उपचार करता येतील का. अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात…

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत देशातील गरीब आणि दुर्बल घटकातील 10 कोटी कुटुंबांना आरोग्य सुविधांचा लाभ दिला जातो. ज्यामध्ये त्यांना 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा मिळतो. अशा स्थितीत यापैकी कोणाच्याही कुटुंबात ओमिक्रॉनचा संसर्ग झालेला रूग्ण असेल तर त्यांना मोफत उपचार मिळणार आहेत. मात्र, या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागेल. (Ayushman Card-Omicron)

 

 

पूर्ण कराव्या लागतील या अटी –

जे लोक गावात राहतात आणि त्यांचे घर कच्चे आहे, कुटुंबात प्रौढ व्यक्ती नसेल, कुटुंबाची प्रमुख महिला असेल, कुटुंबात अपंग व्यक्ती असेल, कुटुंब अनुसूचित जाती, जमाती किंवा भूमिहीन असेल, रोजंदारी मजूर आणि आदिवासी असतील तर त्यांना आयुष्मान भारत योजनेअंतर्गत मोफत कोरोना उपचाराची सुविधा मिळेल.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

असे बनवू शकता आयुष्मान भारत गोल्डन कार्ड

  •  जवळच्या लोकसेवा केंद्रात जा.
  • येथे केंद्राचे अधिकारी यादीतील तुमचे नाव तपासतील.
  • आयुष्मान योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीत तुमचे नाव असेल तर तुम्हाला गोल्डन कार्ड मिळेल.
  • यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, नोंदणीकृत मोबाईल क्रमांक, रेशनकार्ड, फोटो अशा काही महत्त्वाच्या कागदपत्रांच्या छायाप्रती अधिकार्‍याकडे जमा कराव्या लागतील.
  • यानंतर जनसेवा केंद्र अधिकारी तुमची नोंदणी करतील.
  • नोंदणी केल्यानंतर तुम्हाला नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड मिळेल.
  • यानंतर तुमचे आयुष्मान गोल्डन कार्ड 15 दिवसांत घरी पोहोचेल.
Web Title : Ayushman Card Omicron | omicron havoc increased rapidly treatment be free from ayushman card if infected

 

हे देखील वाचा :

PM Narendra Modi | लॉकडाऊनची शक्यता नाकारली ! ‘पॅनिक होऊ नका, पण काळजी घ्या’ – PM मोदींचं आवाहन

Pune Coep Jumbo Covid Centre | सीओईपी जम्बो कोरोना स्पेशालिटी हॉस्पीटल सुरू करण्याच्या तयारीत पण…महापालिकेने जुनीच बिले न दिल्याने संस्थां काम करणार का याबाबत साशंकता

MLA Sunil Tingre | आमदार सुनिल टिंगरे दुसऱ्यांदा ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, मनपा आयुक्त विक्रम कुमारांसोबत केला होता पाहणी दौरा

 

Related Posts