IMPIMP

Balasaheb Thorat | एमआयएमच्या युतीला शिवसेनेचा नकार, राष्ट्रवादीकडून ‘एक’ अट; आता काँग्रेसची भूमिका बाळासाहेब थोरातांनी केली स्पष्ट !

by nagesh
Balasaheb Thorat | Will Uddhav Thackeray participate in Congress' Bharat Jodo Yatra?

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Balasaheb Thorat | भाजपला (BJP) पराभूत करण्यासाठी एमआयएमने (MIM) महाविकास आघाडीला (Maha Vikas Aghadi) युतीची ऑफर दिली आहे. या ऑफरवरून राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे. या युतीच्या ऑफरवर शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादीने (NCP) आपली भूमिका स्पष्ट केली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील तिसरा पक्ष काँग्रेसचे (Congress) नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचं यावर स्पष्टीकरण आलं आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

काँग्रेसला कोणत्याच समाजाचा, धर्माचा कट्टरवाद मान्य नाही. आम्हाला सर्व धर्म समभाव हवा आहे. सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं तत्वज्ञान आम्ही मानतो आणि त्यानुसार पुढे जात आहोत. भाजपचा कट्टरवाद आणि एमआयएमचा कट्टरवाद हा एकच असून ही मान्य होणारी गोष्ट नसल्याचे बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी सांगितलं. यावेळी बोलताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केलेल्या वक्तव्यालाही थोरातांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

 

आमच्या संपर्कात महाविकास आघाडी सरकारचे आमदार असल्याचं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं होतं.
याच पार्श्वभूमीवर बोलताना, महाविकास आघाडीच्या 170 आमदारांची एकजूट भक्कम आहे.
भाजपचा कोणताही नेता काही बोलणार आणि आम्ही त्यांना उत्तर द्यावं ही अपेक्षा योग्य नाही, असं थोरात म्हणाले.

 

दरम्यान, युतीच्या ऑफरला (Alliance Offers) शिवसेनेच्या संजय राऊत (Sanjay Raut) यांनी स्पष्टपणे नकार कळवला आहे.
त्यानंतर, एमआयएमला महाविकास आघाडीसोबत यायचं असेल तर ते भाजपविरोधी आहेत हे कृतीतून दाखवावं लागेल, असं राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी म्हटलं आहे.
त्यामुळे आता महाविकास आघाडी काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहेत.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

Web Title :- Balasaheb Thorat | ncp mim alliance congress leader balasaheb thorat refutes new political equation in maharashtra

 

हे देखील वाचा :

Pune News | … तर आता नवे संगीत युग सुरु झालेय ! पं. हृदयनाथ मंगेशकर यांची भावना; कोथरूडमध्ये रंगली ‘स्वरस्वती’ सांगीतिक मैफल

Lemon Juice Benefits | लिंबूचा रस डोक्याच्या त्वचेसाठी फायदेशीर आहे का?, वाचा सविस्तर

Multibagger Penny Stock | केवळ 2 वर्षात 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर मल्टीबॅगर शेयरमधून कमावले 16 लाख रुपये; जाणून घ्या कसे?

 

Related Posts