IMPIMP

कर्जतमधील कोरोना योध्द्यांना बारामती अ‍ॅग्रोची ‘ऊर्जा’ !

by bali123
Baramati Agro's 'energy' to Corona warriors in Karjat!

कर्जत : सरकारसत्ता ऑनलाइनकोरोनाच्या वैश्विक संकटात अहोरात्र आपले कर्तव्य बजावणा-या अत्यावश्यक सेवेतील कोरोना योध्द्यांकरिता Corona warriors बारामती अ‍ॅग्रोचे सीईओ व आ. रोहित पवार यांच्या संकल्पनेतून बारामती अ‍ॅग्रोतर्फे ‘उर्जा’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. कोरोनाच्या या दुस-या लाटेच्या कालावधीत पार पडलेल्या थोर व्यक्तीमत्वांच्या जयंतीनिमित्त स्मरण म्हणून हा उपक्रम राबवण्यात येत असून या उपक्रमांतर्गत बारामती अ‍ॅग्रोतर्फे सामाजिकी बांधिलकीतून तालुक्यातील आरोग्य यंत्रणा, पोलीस, महसूल यासारख्या प्रशासनात कार्यरत कोरोना योध्द्यांसाठी Corona warriors ‘ओआरएस एनर्जी ड्रिंक’ देण्यात आले. सोमवारी हे ओआरएस एनर्जी ड्रिंक आ. रोहित पवार यांच्या हस्ते पंचायत समिती सभागृह येथे तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

तुम्ही सुद्धा आहात PhonePe यूजर तर घरबसल्या घेऊ शकता ICICI Pru चा टर्म इन्श्युरन्स, कुटुंबाला मिळेल 25 लाख रुपयांपर्यंत सुरक्षा

कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी नाविण्यपूर्ण उपाययोजना आ. रोहित पवार आपल्या कर्जत मतदारसंघात राबवत आहेत. केवळ आपल्या कर्जत मतदारसंघापुरतेच मर्यादित न राहता राज्यस्तरावरही आ. रोहित पवार विविध प्रयत्न करत आहेत. दरम्यान एकीकडे रुग्णसेवेसाठी कार्यरत असतानाच कोरोना विरुध्दच्या या लढाईत अहोरात्र आपले कर्तव्य बजावून समाजाच्या संरक्षणाची ढाल होत कार्य करणा-या कोरोना योध्द्यांसाठी Corona warriors देखील आ. रोहित पवार यांच्यातर्फे बारामती अ‍ॅग्रोच्या माध्यमातून ‘उर्जा’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

कोरोनाची दुसरी लाट सुरु झाल्यानंतरच्या या कालावधीत, माता रमाबाई आंबेडकर, संत सेवालाल, छ. शिवाजी महाराज, संत गाडगेबाबा, सुभेदार मल्हारराव होळकर, स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे भोसले, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, महाराणा प्रताप, छ. संभाजी महाराज यांच्या जयंती पार पडल्या. तर येत्या काही दिवसात असणारी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती होय. या थोर व्यक्तीमत्वांनी समाजासाठी कार्य करून राष्ट्रशक्तीची ज्योत माणसामाणसांमध्ये लावली, एक आदर्शवत ‘ऊर्जा’ आपल्या प्रत्येकामध्ये या थोर व्यक्तीमत्वांनी निर्माण केली. या महान व्यक्तीमत्वांचे स्मरण म्हणून ‘ऊर्जा’ हा उपक्रम आ. रोहित पवार यांच्या ‘बारामती अ‍ॅग्रो’तर्फे राबवण्यात येत आहे.

कर्जत-जामखेडमधील शेतमाल साठवणुकीची चिंता कायमची मिटणार; मिरजगाव व खर्डा येथे वखार उभारणीस मान्यता, आ. रोहित पवार यांच्या पाठपुराव्याला यश

आरोग्यविषयक काळजी व सद्भावनेतूनच बारामती अ‍ॅग्रोतर्फे सामाजिक बांधिलकीतून ‘उर्जा’ उपक्रमांतर्गत कर्जत तालुक्यातील आरोग्य यंत्रणा, पोलीस, महसूल यासारख्या प्रशासनात कार्यरत कोरोना योध्द्यांसाठी Corona warriors ‘ओआरएस एनर्जी ड्रिंक’ देण्यात आले. काही दिवसांवरच पावसाळा सुरु होत असून या वातावरणीय बदलामुळे रोगराईची साथ पसरते तेव्हा अशा परिस्थितीत प्रतिकारशक्ती सुदृढ राहावी, यासाठी हे ‘ओआरएस एनर्जी ड्रिंक’ या कोव्हीड योध्द्यांसाठी देण्यात आले.

यावेळी प्रांत अधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार नानासाहेब आगळे, मुख्याधिकारी गोविंद जाधव, गटविकास अधिकारी अमोल जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोनाली बांगर यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया-
अत्यावश्यक सेवेतील यंत्रणा अहोरात्र आपले कर्तव्य बजावत आहेत. तेव्हा त्यांच्याप्रती असणा-या आरोग्यविषयक काळजी व सद्भावनेतूनच बारामती अ‍ॅग्रोतर्फे ‘उर्जा’ उपक्रमांतर्गत कोरोना योध्द्यांसाठी ‘ओआरएस एनर्जी ड्रिंक’ टेट्रापॅक देण्यात आले. या योध्द्यांना शरिरातील डीहायड्रेशन रोखण्यासाठी ओआरएस हे परिणामकारक ठरणार असून यामुळे ख-या अर्थाने बारामती अ‍ॅग्रोतर्फे “ऊर्जा” देण्याचा उद्देश साध्य होईल. थोर व्यक्तींची जयंती आपण दरवर्षी साजरी करत असतो. परंतु सद्या कोरोनाचा काळ असल्यामुळे नेहमीप्रमाणे जयंती उत्सव आपल्याला साजरी करता येत नाही. या महान व्यक्तीमत्वांनी सर्वसामान्यांचे हित जोपासण्याचा विचार दिला. याच दृष्टीकोनातून कोव्हीड योध्द्यांप्रती कृतज्ञता म्हणून “ऊर्जा” हा उपक्रम राबवत आहोत.

– आ. रोहित पवार.
(सीईओ- बारामती अ‍ॅग्रो लिमीटेड)

Also Read :

‘ती फाईल कोणत्या भुतांनी पळवली, याचा खुलासा करावा’; शिवसेनेची राज्यपालांवर टीका

उद्धव ठाकरेच Best CM ! ‘कोरोना’ची दुसरी लाट प्रभावीपणे हाताळणारे मुख्यमंत्री म्हणून पहिली पसंती

 

Atul Bhatkhalkar : ‘राज्यपालांना विमानातून उतरवणार्‍या सत्ताधार्‍यांनी राज्यघटना शिकवू नये’

Tiger 3 मध्ये ‘हा’ अभिनेता साकारणार पाकिस्तानी एजंटची भूमिका

Related Posts