IMPIMP

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : बंडगार्डन पोलिस स्टेशन – मनोरुग्ण आरोपी ससूनमधून गेला पळून; आरोपीला एकटे सोडल्याने घेतला फायदा

by nagesh
 Pune Crime News | Pune Crime News : Bundagarden Police Station - Psychotic accused escaped from Sassoon; Benefit was taken by leaving the accused alone

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Crime News | आर्म अ‍ॅक्टखाली अटक केलेल्या आरोपीला ससून रुग्णालयात (Sasoon Hospital) उपचारासाठी आणले असताना बंदोबस्तावरील पोलीस त्याला एकटे सोडून गेले. हे पाहून आरोपी पळून गेला.

 

बाळु ऊर्फ चक्रधर रानबा गोडसे Balu alias Chakradhar Ranba Godse (वय ३०, रा. टाकळी लोणार, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर – Ahmednagar) असे या आरोपीचे नाव आहे. ही घटना ससून रुग्णालयातील वॉर्ड नं. २६ मध्ये शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता घडली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत पोलीस शिपाई प्रकाश मांडगे (Police Prakash Mandage) यांनी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये (Bundgarden Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळु गोडसे याला श्रीगोंदा पोलिसांनी (Shrigonda Police) शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केली होती. त्यानंतर त्याच्यावर उपचारासाठी १९ एप्रिल रोजी ससून रुग्णालयात आणण्यात आले होते.
वॉर्ड नं. २६ येथे त्याच्यावर मानसिक उपचार करण्यात येत होते. त्यासाठी बंदोबस्तासाठी पोलिसांची नेमणूक केली होती. फिर्यादी व पोलीस शिपाई संजय कोतकर (Police Sanjay Kotkar) हे ड्युटीवर हजर होते. आरोपीला कधी डिस्चार्ज देण्यात येणार हे विचारण्यासाठी फिर्यादी गेले होते. त्याचवेळी कोतकर हे वॉशरुमला गेले. हे पाहून गोडसेने बेडीमधून त्याचा हात काढून गर्दीचा फायदा घेऊन पळून गेला. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime News | Pune Crime News : Bundagarden Police Station – Psychotic accused escaped from Sassoon; Benefit was taken by leaving the accused alone

 

हे देखील वाचा :

Get Together Marathi Film | “गेट टूगेदर’ चित्रपटातील “आभास की भास” या रोमँटिक गाण्याला जावेद अली, प्रियांका बर्वे यांचा स्वरसाज (Video)

Pune Kothrud News | पुणे : कोथरुड – सोलार, सीसीटीव्ही आणि घनकचरा प्रक्रिया उपक्रमांसाठी मदत करणार; चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन

Bharatiya Vidya Bhavan-Infosys Foundation | भारतीय विद्या भवनमध्ये 27 एप्रिल रोजी ‘लक्ष्य’ नृत्य कार्यक्रम

Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे पिंपरी-चिंचवड क्राईम न्यूज : चाकण पोलिस स्टेशन – अनैतिक संबंधातून सव्वा वर्षाच्या मुलाला गरम पाण्यात बुडवून मारले

 

Related Posts