IMPIMP

Get Together Marathi Film | “गेट टूगेदर’ चित्रपटातील “आभास की भास” या रोमँटिक गाण्याला जावेद अली, प्रियांका बर्वे यांचा स्वरसाज (Video)

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर गाणं लाँच

by nagesh
Get Together Marathi Film | Romantic song "Abhaas Ki Bhaas" from the movie "Get Together" composed by Javed Ali, Priyanka Barve

सरकारसत्ता ऑनलाईन  –   Get Together Marathi Film | ‘आभास की भास की तुझा हा श्वास गं’ असे शब्द असलेलं गेट टूगेदर या चित्रपटातलं रोमँटिंग गाणं अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर लाँच करण्यात आलं. अतिशय श्रवणीय संगीत, जावेद अली,  प्रियांका बर्वे यांचा आवाज या गाण्याला लाभला असून, उत्तम पद्धतीनं हे गाणं चित्रीत करण्यात आलं आहे. येत्या १९ मे ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे (Get Together Marathi Film)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सतनाम फिल्म्स प्रस्तुत गेट टुगेदर या चित्रपटाची निर्मिती  समीर गोंजारी, संजय गोंजारी, आशिष धोत्रे यांनी केली आहे. चित्रपटाचं पटकथा लेखन आणि दिग्दर्शन सचिन धोत्रे, तर कथा आणि संवाद लेखन प्रवीण कुचेकर यांनी केलं आहे. अजय रणपिसे यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे. तर एकनाथ गिते, त्रिशा कमलाकर, श्रेया पासलकर, इमरान तांबोळी, संजना काळे, मिताली कोळी, सुशांत कोळी,  साकिब शेख आदींच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. (Get Together Marathi Film)

 

 

काही दिवसांपूर्वीच गेट टुगेदर या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला होता. तर आता पहिलं गाणं लाँच करण्यात आलं आहे.
शालेय किंवा कॉलेज जीवनात एखाद्या मुलावर किंवा मुलीवर प्रेम असतं. पण काही ना काही कारणानं ते प्रेम यशस्वी होत नाही.
या पहिल्या प्रेमाची पुन्हा आठवण करून देण्याचा प्रयत्न “गेट टुगेदर” या चित्रपटात करण्यात आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Get Together Marathi Film | Romantic song “Abhaas Ki Bhaas” from the movie “Get Together” composed by Javed Ali, Priyanka Barve

 

हे देखील वाचा :

Pune Kothrud News | पुणे : कोथरुड – सोलार, सीसीटीव्ही आणि घनकचरा प्रक्रिया उपक्रमांसाठी मदत करणार; चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन

Bharatiya Vidya Bhavan-Infosys Foundation | भारतीय विद्या भवनमध्ये 27 एप्रिल रोजी ‘लक्ष्य’ नृत्य कार्यक्रम

Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे पिंपरी-चिंचवड क्राईम न्यूज : चाकण पोलिस स्टेशन – अनैतिक संबंधातून सव्वा वर्षाच्या मुलाला गरम पाण्यात बुडवून मारले

 

Related Posts